अहमदनगर । वीरभूमी- 17-Mar, 2022, 10:37 PM
राज्यात मार्च हिट नंतर शनिवार दि. 19 मार्च पासून आठवडाभर ढगाळ वातावरण असणार आहे. तर 20 मार्च ते 25 मार्च या कालावधीत दररोज भाग बदलून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.
मागील काही दिवसापासून उष्णता वाढत असल्याने लाही लाही होत होती. मात्र शनिवार दि. 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर रविवार दि. 20 मार्च पासून दररोज भाग बदलून पाऊस पडणार आहे.
रविवार दि. 20 मार्च पासून कोल्हापूर, पाटण, पुणे, पणजी, सावंतवाडी आदी भागात पाऊस पडणार आहे. अशी माहिती वीरभूमीला दिली आहे.
तसेच बुधवार दि. 23 मार्च ते शुक्रवार दि. 25 मार्च या दरम्यान सांगली, पुणे, कराड, विटा, इस्लामपूर, रत्नागिरी, चिपळून, खेड, वाई, सातारा, इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, वणी यासह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव व पारनेर या काही भागात पडणार आहे.
तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. ज्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेथील शेतकर्यांनी द्राक्ष, बेदाणा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, टमाटे आदी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.
Comments