आ. मोनिका राजळे यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा
पाथर्डी । वीरभूमी - 24-Mar, 2022, 06:20 PM
पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसर व 43 गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील इतर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे उपस्थीतीत त्यांचे दालनात आ. मोनिकाताई राजळे यांची बैठक झाली.
या बैठकीला आ. राजळे यांचेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता प्रशांत भामरे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अधिक्षक अभियंता सुनंदा नरवडे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, कार्यकारी अभियंता आनंद रुपनर आदी उपस्थीत होते.
या बैठकीत भगवानगड परिसर व 43 गावे ही योजना मंजूरीच्या अंतीम टप्यात होती. परंतू DSR बदलल्यामुळे नवीन DSR नुसार येत्या 8 दिवसात तांत्रिक मंजूरी घेऊन प्रशासकीय मान्यता देण्यात येईव व लगेचच निविदा प्रक्रिया सुरु होईल, असे नामदार गुलाबराव पाटील व संबंधीत अधिकार्यांनी सांगितले.
त्याचबरोबर हातगाव व इतर 28 गावे योजना कार्यान्वीत नाही. शहरटाकळी व हातगाव योजना एकत्रीत आहेत. थकीत विद्युत बिलापोटी विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने हातगाव योजना कार्यान्वीत नाही. सदर हातगाव व शहरटाकळी या दोन्ही योजनांना स्वतंत्र विद्युत जोडणी देवून ही योजना कार्यान्वीत करण्याचीमागणी केली.
तसेच या व इतर योजनांसाठी सौर उर्जेसाठी जागा उपलब्ध होत असल्यास त्या पर्यायाचा विचार करणे बाबत निर्देश दिले. त्याचबरोबर बोधेगाव व 7 गावे तसेच प्रस्तावीत अमरापुर व माळीबाभुळगाव इतर 49 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांन संदर्भात आढावा घेण्यात आला.
ZIEksUgwCnePL