श्रीगोंदा । वीरभूमी - 22-Apr, 2022, 10:41 PM
श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्या सहकारात आशिया खंडात अग्रेसर असलेल्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया 2022-2027 पर्यंतसाठी निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण होवून अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्या या निवडणूकीत राजेंद्र नागवडे गटाचे ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय भैरवनाथ महाराज सहकार परिवर्तन पॅनलने बाजी मारुन सर्वच्या सर्व जागा जिंकून इतिहास घडविला आहे.
संस्थेत कायम 41 वर्षे सत्ता भोगणार्या भगवानराव पाचपुते यांची एकहाती सत्ता उलथवत मतदारांनी ऐतिहासिक बदल घडवून आणला असल्याने काष्टी गावात एकच जल्लोश झाला आहे.
शेकडो कोटींची वार्षिक उलाढाल असणार्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेची निवडणूक शुक्रवार दि. 22 रोजी पार पडली यामध्ये 677 मतदाना पैकी एकूण 674 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी चार वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी सुरु होवून दिड तासात मतमोजणी पूर्ण होवून यामध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते कैलासराव शिवराम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी संस्थेत परिवर्तन करत इतिहास घडविला आहे.
भैरवनाथ महाराज सहकार परिवर्तन पनलचे विजयी उमेदवार राकेश कैलास पाचपुते, सुभाष साहेबराव पाचपुते, लक्ष्मण ज्ञानदेव पाचपुते, शहाजी शिवाजी भोसले, सर्जेराव दत्तात्रय पाचपुते, विठ्ठलराव जगन्नाथ काकडे, बाळासाहेब संभुदेव पाचपुते, रोहिदास पंढरीनाथ सोनवणे, प्रा. सुनिल काळूराम माने, अलका संजय नलगे, सुवर्णा मनोहर दांगट, दादासाहेब बाबुराव कोकाटे, काशिनाथ अप्पासाहेब काळे या उमेदवारांनी 35 ते 70 मताच्या फरकाने परिवर्तन घडून आणले आहे.
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत दोन्ही पार्टीने चांगलेच वातावरण तापविले होते. होणारी निवडणूक ही सत्ताधारी गटाच्या अस्तित्वाची तर विरोधी गटाने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये विरोधी राजेंद्र नागवडे गटाने बाजी मारुन परिवर्तन घडविले आहे.
या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाचे भगवानराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली गेली 41 वर्षे संस्थेवर एकहाती सत्ता होती. ती आता परिवर्तन होवून संपुष्टात आल्याने भगवानराव पाचपुते यांना मोठा राजकीय धक्का आहे.
या निवडणुकीत ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांचा मुलगा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाचपुते, माजी अध्यक्ष भास्करराव जगताप, संचालक लक्ष्मीकांत राम पाचपुते व आदीकराव चव्हाण या प्रमुख उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे.
Comments