विचारांचे संस्कार साहित्यातून मिळतात
विचारांचे संस्कार साहित्यातून मिळतात
- गणेश खाडे 12-May, 2022, 01:21 PM
सकारात्मक विचारांमुळे उर्जा निर्माण होत असते. तसेच आदर्श आणि लोक कल्याणकारी जीवन जगण्याची प्रेरणा मिळात असते. असे प्रभावी उत्कृष्ट आणि दर्जेदार विचारांचे संस्कार आपल्याला साहित्यातून मिळत असतात तसेच जीवन जगत असताना आपले आचार, विचार, वर्तवणुक, गुण-दोष, चांगले-वाईट विचार, आपली सामाजिक प्रतिमा, प्रतिष्ठा या सगळ्या महत्त्वाच्या बाबी ह्या आपल्यावर झालेल्या वेगवेगळ्या संस्कारावर अवलंबून असतात.तसेच आपलं जीवन सार्थकी लागलं किंवा निरर्थक झाले. हे फक्त आपल्या वर झालेल्या चांगल्या, वाईट, योग्य, अयोग्य संस्काराचे प्रतिबिंब स्वरूप असते.
आपण जीवन जगत असताना जीवना मध्ये जीवनाच्या वेग वेगळे टप्यावर जसं बालपणी आई, प्राथमिक शिक्षण घेताना शिक्षक, दहावीच्या दरम्यान मित्र आणि दहावी नंतर समाज, वातावरण आणि या सगळ्यामध्ये या दरम्यान आपण वाचन करत असलेलं साहित्य खुप महत्वपूर्ण आहे. कारण या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात.
आपले आई-वडील, शिक्षक, मित्र आणि आजुबाजुला असणारे वातावरण यानुसार आपण घडत असतो. तसेच दरम्यानच्या काळात काही संस्कार आपल्यावर होत असतात. तसेच सगळ्यात महत्वाचे आणि प्रभावी संस्कार ज्याला आपण विचारांचे संस्कार म्हणतो. हे विचारांचे संस्कार आपल्याला जीवनात खूप महत्वपूर्ण भुमिका निभावत असतात. ते संस्कार आपल्याला उत्कृष्ट आणि दर्जेदार साहित्यातून मिळत असतात. तसेच त्याचे परिणाम स्वरूप आपल्या जीवनावर सकारात्मक होत असतात आणि त्या संस्कारातून आपण घडत असतो.
या सगळ्या संस्कारांमध्ये विचारांचे संस्कार हे जीवनात सकारात्मक उर्जा निर्माण करतात आणि आपल्या आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात. म्हणून हे विचारांचे संस्कार खूप महत्वपूर्ण आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये दैनंदिन आणि नियमित दर्जेदार साहित्य आपण वाचन केलं पाहिजे. अनादी काळापासून ते आज तागायत म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग या चारही युगात मानवी जीवनातील विचारांच्या संस्काराचे साहित्य हे उगमस्थान राहिलेले आहे. सध्याच्या गतिमान, आधुनिक तसेच तंत्रज्ञान आणि विज्ञान युगातील कालखंडात सुद्धा साहित्य हे मानवी जीवनातील मूलभूत आणि पायाभूत संस्काराचे प्रेरणास्थान आहे.
साहित्य ही कलाकृती कल्पनाप्रधान असली तरी साहित्याची पाळेमुळे वास्तवाच्या जमिनीवर खोलवर रुजलेली असतात. वास्तवातील घटना, प्रसंग याची निवड करून त्याची पुनर्रचना करून आणि त्यामध्ये स्वतःची नवी भर घालून साहित्यिकाने साधलेली वास्तव संमातर अशी ती नवनिर्मिती असते. सगळ्यात महत्वाचे तीस हित असते. म्हणजे साहित्याची रचना समाजाचं हित साध्य होण्यासाठीच केलेली असते.
ज्या विचारातून समाज हित साध्य होऊ शकत नाही ते विचार साहित्य स्वरुप नसतात किंवा साहित्याचा भाग होऊ शकत नाही. साहित्यातून मिळणारे विचारांचे संस्कार आपल्याला आदर्श जीवन जगण्याची आणि यशस्वी होण्याची प्रेरणा देतात. तसेच साहित्यातून मिळणारे संस्कार आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देतात.
ज्या पद्धतीच्या साहित्याचे आपण अनुकरण करतो, वाचन करतो किंवा ऐकतो. त्या पद्धतीने आपलं जीवन घडत असतं आपण अवलोकन केलेल्या साहित्य विचारांचे संस्कार हे परिणाम स्वरूप चांगले-वाईट आपल्या जीवनामध्ये दिसत असतात. म्हणून आदर्श आणि उत्कृष्ट दर्जाचे दर्जेदार साहित्य आपण नियमित दैनंदिन वाचन केले पाहिजे. ऐकले पाहिजे कारण जीवनातील अमुल्य महत्वपूर्ण असे विचारांचे संस्कार आपल्याला साहित्यातून मिळत असतात.
- गणेश खाडे,
संस्थापक, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज
इतिहास अभ्यासक व लेखक, बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक
मो. 9011634301
Comments