राजूर पोलिस ठाण्यात एका विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
अकोले । वीरभूमी - 13-May, 2022, 09:42 PM
राजुर गटाच्या जि. प. सदस्या सौ. सुनिताताई भांगरे यांना रामेश्वर गजानन शातलवार या व्यक्तीने स्वत:च्या मोबाईलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे राजुर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील राजुर गटाच्या जि. प. सदस्या सौ. सुनिताताई भांगरे यांना शुक्रवारी दु. 11ः49 मिनिटांनी रामेश्वर गजानन शातलवार यांनी स्वत:च्या मोबाईलवरुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
‘मी मुतखेल येथील शासकिय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाचा भाऊ बोलत असुन माझ्या भावाला आपण त्रास देऊ नये व त्याच्यावर कारवाई करु नये. अन्यथा आपणाला रस्त्यात कोठेही अडवुन जिवे मारण्यात येईल. तुम्हाला माझे काय करायचे ते करा, अशी धमकी देण्यात आली. या संदर्भात राजुर पोलिस स्टेशनला सुनिताताई भांगरे यांनी रामेश्वर गजानन शतलवार या व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सुनिताताई भांगरे या राजुर गटाच्या जि. प. सदस्या असुन त्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माजी अध्यक्ष असुन सध्याही सदस्य आहेत. त्यांनी काही दिवसापुर्वी मुतखेल येथील आश्रमशाळेत भेट दिली असता त्या ठिकाणी किडेयुक्त पाणी व इतर सुविधांचा अभाव सुनिताताईंना आढळुन आला. त्यांनी त्या संदर्भात प्रकल्प कार्यालयात कारवाईचा बडगा उगारला होता.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय मार्फत चालवल्या जाणार्या आश्रमशाळांमधील समस्या व अंदाधुंदी कारभाराबाबात मागील काही दिवसांमध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रकल्पस्तरीय समितीच्या सदस्या सुनिताताई अशोकराव भांगरे यांनी भांडेफोड करून त्या बाबी समोर आणल्या होत्या.
कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना जर त्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसतील, शिक्षणाची गुणवत्ता मिळत नसेल. तरी हा व्यर्थ जाणार्या खर्चाला अर्थ तरी काय? या भूमिकेतून सौ.सुनिताताई अशोकराव भांगरे या वारंवार आश्रमशाळांना भेटी देत असतात. मुतखेल येथील आश्रम शाळेतील गंभीर प्रकार त्यांनी समोर आणला होता.
आज सौ. भांगरे यांना मोबाईल वरून मुतखेल आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाचा भाऊ बोलतोय सांगुन फोन केला व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शिवीगाळ केली. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहीजेत. यासाठी आदिवासी वाड्यावस्त्यांवरील महिला एकटावल्या आहेत. अशा वाईट प्रवृत्तीचा जाहिर निषेध विविध स्तरातून होत आहे.
Comments