पाथर्डी । वीरभूमी- 05-Jun, 2022, 03:16 PM
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पाथर्डी तालुक्यातील अकोला सेवा सोसायटी निवडणुकीत मोहटादेवी जानपीर बाबा पॅनल ने 13 पैकी 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी विजयी संचालकाचा सत्कार करुन अभिनंदन केले.
अकोला येथे मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत माजी सरपंच अनिल ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील मोहटादेवी जानपीर बाबा पॅनलने 150 मतांच्या फरकाने विजय मिळवत सेवा सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली. गेल्या 30 वर्षांपासून आपल्याकडे असलेली सत्ता कायम राखण्यात ढाकणे यांनी यश मिळवले.
विजया नंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.सी. देवळालीकर यांनी कामकाज पाहिले.
या निवडणुकीत सुनील ढाकणे, सुखदेव गर्जे, नारायण गर्जे, मारुती पालवे, बाबासाहेब बाळासाहेब गर्जे, सुभाष घुगे, विठ्ठल डुकरे, विजयकुमार पालवे, कुसुम धायतडक, अनिता गर्जे, संजय पंडित, प्रकाश थोरात हे सर्व उमेदवार सुमारे 150 मतांच्या फरकाने विजयी झाले. तर बाळासाहेब धायतडक, बाळासाहेब बबन गर्जे यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले.
विजयानंतर पॅनल प्रमुख अनिल ढाकणे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे करणार असून सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून सोसायटीची इमारत बांधण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू. तसेच सोसायटीच्या माध्यमातून फळबागेसाठी चालना देण्याचे काम करू. शेतकरी हिताच्या व त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू, असे ढाकणे म्हणाले.
या निवडणुकीत डॉ. गणेश धायतडक, अर्जुन धायतडक, प्रदीप पालवे, बाळासाहेब गर्जे, कृष्णा धायतडक, दौलत गर्जे, राजेंद्र गर्जे, बंटी गर्जे, संतोष गर्जे, सुनील पालवे, धर्मा गर्जे, पोपट डुकरे, महादेव गर्जे, जनार्दन गोसावी, गोविंद गर्जे, हबीब शेख, दिलीप घुगे, पंकज शिरसाट, राधाकिसन दातीर, नारायण धायतडक, हेमंत नागरे, बालाजी साबळे, गणेश ढाकणे, बापू केकाण, भक्तराज गर्जे, शिवाजी गर्जे, बाळासाहेब ढाकणे, रामनाथ ईधाटे, बाबुलाल शेख, संजय ढाकणे, रामा डुकरे, विठ्ठल पालवे, रणजित थोरात आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Comments