आ. पाचपुतेंच्या राजकारणाला ‘साजनगिरी'चा अडसर
कोटींची कोटी उड्डाणे । पाचपुतेंचे राजकारण संपविण्याचा विडाच उचलला?
विजय उंडे । वीरभूमी - 08-Jun, 2022, 12:36 PM
श्रीगोंदा : आमदार बबनराव पाचपुते यांनी 40 वर्षे राजकरण जोशात केले. पाचपुते या आडनावाला त्यांनी महाराष्ट्रभर वलय प्राप्त करून दिले. आमदार पाचपुते यांच्या राजकारण प्रवेशावेळी सामान्य असणारे हे कुटुंब आज कोटींची उड्डाणे घेत आहे. बबनरावांच्या जिवावर कोट्याधीश झालेले आमदार पाचपुते यांचे राजकारण संपू पाहत आहेत. पाचपुते यांचे राजकारण संपवण्याचा विडाच ‘साजनगिरी'च्या माध्यमातून कट आखला जात आहे.आमदार बबनराव पाचपुते हे कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांना त्यांनी रंकाचे राजे बनवले. आमदार बबनराव पाचपुते यांच्या पेक्षा आपण फार मोठे झालोत अशी स्वप्ने पैशाच्या जोरावर या तथाकथित माणसांना पडू लागली आहेत. आमदार पाचपुते यांचे राजकारण संपले की आपलाच राजकारणात उदय होईल. या वेड्या समजुतीतून ‘साजन’गिरीने पाचपुते विरोधकांशी छुपी युती करुन आपला अजेंडा जोरात चालविला आहे.
सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत व सहकार महर्षी काष्टी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात जाऊन विरोधकांशी ‘साजनगिरी'ने छुपी युती केली. आमदार पाचपुते यांचा पाडाव व्हावा यासाठी कटकारस्थाने करून विरोधकांना रसद पुरवण्याचे काम ‘साजन’गिरीने केले.
भारतात लोकशाहीचे राज्य आहे. गेल्या सत्तर वर्षाच्या भारतीय लोकशाहीत देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या पदावर औद्योगिक साम्राज्य असलेले टाटा किंवा अंबानी घराणे गेले नाहीत. मात्र दबंगगिरीफेम ‘साजनगिरी'ला मात्र पैशाची एवढी घमेंड चढली की अर्थकारणाच्या जोरावर आपण तालुक्यातल्या कुणालाही वाकवू शकतो. आमदार बबनराव पाचपुते आपली शिकार होतील अशा अविर्भावात ही मंडळी सध्या वावरत आहेत.
आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुकाभर कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले. आर्थिकदृष्ट्या व शारीरिक दृष्टीने आमदार पाचपुते अडचणीत असतानाही कार्यकर्ते तूसभरही ढळले नाहीत. आमदार पाचपुते यांच्यावर तालुक्यातील कार्यकर्ते प्रचंड प्रेम करतात. तालुक्याच्या राजकारणात रेघोटीही न ओढलेल्या ‘साजनगिरी'ला आमदार पाचपुते यांना छुपा विरोध करणे भविष्यात अडचणीचे ठरणार आहे.
आमदार बबनराव पाचपुते राजकारणात आले नसते तर आपण कोठे असतो याचा विसर सोयीस्करपणे ‘साजन’गिरीला पडला आहे. आमदार पाचपुते यांचा ब्रॅण्ड आपण वापरला नाही तर तालुक्याच्या राजकारणात नदीच्या पाण्याप्रमाणे ‘साजन’गिरी कधी वाहून जाईल हे पाहण्यासाठी कोणा ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही.
स्व. बाबा नजू राहिंज सोसायटीत पदाधिकारी निवडीत ‘साजनगिरी'ची दबंगगिरी
पूर्वीची काष्टी सोसायटी नंबर दोन सोसायटीची नुकतीच निवडणुक झाली. आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गर्शनाखाली बबनराव राहिंज यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व 13 जागा जिंकल्या. चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीवेळी कार्यकर्ते आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे सल्लामसलत करण्यासाठी गेले. आमदार पाचपुते यांच्याकडे का गेले म्हणून ’साजनगिरी'ने कार्यकर्त्यांना अर्वाच्च भाषा वापरली. 40 वर्षे आमदार पाचपुते यांचे नेतृत्व तळहाताप्रमाणे सांभाळणार्या कार्यकर्त्यांनी काय घ्यायचा तो घेतला? मात्र या दबंगगिरीचे राजकरण थोड्याच दिवसात तालुक्याच्या राजकारणात पोहोचणार याबाबत कोणतीही शंका नाही.
Comments