नवी दिल्ली । वीरभूमी- 09-Jun, 2022, 07:46 AM
केंद्र सरकारने 2022-23 वर्षासाठी खरिपातील 14 पिकांसाठी किमान हमी भावात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली.
यासोबत सामान्य दर्जाच्या धानाच्या किमान हमी भावातही 100 रुपये वाढ करून ती 2,040 रुपये करण्यात आला आहे.
या वाढीनुसार धान्य किमान हमी भाव आणि वाढ पुढीलप्रमाणे (भाव रुपयांत/प्रति क्विंटल)- धान (साधारण) 2,040 रु. (100 रु. वाढ), धान (ए ग्रेड) 2,060 (100), ज्वारी (हाइब्रिड) 2,970 (232), बाजरी 2,350 (100), नाचणी 3,578 (201), मका 1,962 (92), तूर 6,600 (300), मूग 7,755 (480), उडिद 6,600 (300), भुईमूग 5,850 (300), सूर्यफूल 6,400 (385), सोयाबिन 4,300 (350), तीळ 7,830 (523), कापूस 6,080 (354).
खरिपातील या 14 पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्यात आली आहे.
IuGqYPMLCityxSHQ