अकोले आगारातील वाहकाची माळशेज घाटात आत्महत्या
अकोले । वीरभूमी - 09-Jun, 2022, 10:09 AM
अकोले एस.टी. डेपोचे वाहक गणपत मारुती इदे (वय 44, रा. भंडारदरा) यांनी माळशेज घाटात उडी मारून आत्महत्या केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अकोलेच्या एस.टी. डेपोत वाहक (कंडंक्टर) म्हणून कार्यरत असलेले गणपत मारुती इदे हे काल अकोले-कल्याण बस घेऊन गेले होते. कल्याणला मुक्कामी असताना ते रात्री घरी येऊन परत ड्युटीला जात असताना त्यांनी माळशेज घाट येथे रस्त्याचे काम चालु असल्याने ट्राफिक जाम असल्याने गाडी थांबली असताना गाडीतून उतरून दरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळालेले नाही. मात्र ड्यूटीवर ताण तणाव होता का? की, घरगुती तणाव होता यावर चर्चा सुरु आहे.
कोविड संकटकाळ व नंतर संपाचा कालावधी संपुन नुकतेच महामंडळ व कर्मचारी कामावर रूजू झालेले होते. अशा काळातच वाहकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
संप काळात वाहक- चालकांची आर्थिक स्थिती बिघडलेली होती. नुकतीच संपकाळानंतर एस.टी. महामंडळ व कर्मचारी यांची परिस्थिती रूळावर येत आहे.
Comments