आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ । 17 जुलै रोजी मतदान
अकोले । वीरभूमी- 14-Jun, 2022, 11:15 AM
अकोले तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची कामधेनू असलेली अगस्ती साखर कारखान्यासाठी 17 जुलै रोजी मतदान होत आहे. तर मतदानानंतर 18 जुलै रोजी मतमोजणी नतर नवीन 21 जणांचे संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे.
अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाण्यातील यापूर्वीच्या संचालक मंडळात एकूण 19 संचालक होते. मात्र दोन वर्षांपूर्वी अगस्तिच्या गाळप क्षमतेत 2500 वरून 3500 मेट्रिक टनाची वाढ केल्याने कोतूळ व देवठाण गटातून 2 संचालकांची वाढ झाल्याने आता संचालकांची संख्या 21 झाली आहे.
एकूण 5 गटातून ही निवडणूक होईल. पैकी अकोले गटातील 10 गावांत 1209, इंदोरी गटात 30 गावांतून 1876 मतदार आगर गटातील 30 गावांतून 1928 मतदार कोतूळ गटातून सर्वाधिक 60 गावे 1996 मतदार आहेत. तर देवठाण गटात एकूण 25 गावांचा अंतर्भाव असून 1341 मतदार आहेत.
एकूण 8342 मतदारांवर भावी संचालकांची भवितव्य अवलंबून आहे. कारण मागील पंचवार्षिक निवडणुकीत उत्पादक व अनुत्पादक सर्वच सभासदांना मतदानाचा अधिकार होता. तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीत सुमारे 32 हजार सभासदांमधून सुमारे 18 हजार 500 सभासद मतदानास पात्र होते. पण 17 जुलैस होऊ घातलेल्या निवडणुकीत फक्त 8 हजार 342 सभासदच मतदार म्हणून पात्र आहेत.
यामध्ये सुमारे 3 हजार 300 आदिवासी शेतकरी मतदार असून उर्वरीत बिगर आदिवासी ऊस उत्पादक सभासद आहेत. ही संख्या पूर्वी 11 हजारांहून अधिक होती.
नविन संचालक मंडळाची निवडणूकीत 14 ते 20 जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत असून 21 जून रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होऊन 22 जून सकाळी 11 वाजता पात्र उमेदवारांची यादी जाहीर येईल. माघारीसाठी 22 जून ते 6 जुलैपर्यंत मुदत राहणार असून 7 जुलैला उमेदवार अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
संचालक मंडळावर एकूण 21 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. उत्पादक पाच गटातून प्रत्येकी तीन असे 15 संचालक पाठवायचे आहेत. सोसायटी व संस्था मतदार संघ, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ, इतर मागास प्रवर्ग यातून प्रत्येकी 1 व महिला राखीव मतदारसंघातून 2 असे 6 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
fVtohgjANmYXx