अध्यक्षपदी पुष्पा साळुंके; उपाध्यक्षपदी भिमराव लांडगे
श्रीगोंदा । वीरभूमी - 13-Jul, 2022, 01:47 PM
श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शिवसेना तालुका उपप्रमुख निलेश साळुंके यांच्या मातोश्री पुष्पा बाळासाहेब साळुंके तर व्हाईस चेअरमनपदी भिमराव ज्ञानदेव लांडगे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे तालुक्यात एकमेव चोराचीवाडी सेवा संस्था शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.
नुकतीच ही निवडणूक हनुमान किसानक्रांती पॅनल व भैरवनाथ शेतकरी विकास पॅनल मध्ये अत्यंत चुरशीची झाली होती. आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या निवडणूकीत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांच्या नेतृत्वाखाली जोडल्या गेलेल्या अनेक उच्च सुशिक्षित तरुणांपैकी तालुका उपप्रमुख निलेश साळुंके यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक विजयामुळे ही संस्था शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक विठ्ठल चोर, तुकाराम चव्हाण, नरसिंग थोरात, कालिदास चोर, प्रशांत चोर, पंकज अनभुले, अशोक लांडगे, सुरेखा राजू चोर, संतोष उदमले व स्वप्निल बिबे यांनी मोठया मताधिक्याने विजय मिळवला आहे.
नूतन पदाधिकार्यांचे शिवसेनेचे माजी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांतजी गाडे, युवासेना जिल्हाप्रमुख रविंद्र वाकळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशा निंबळकर, विधानसभा संपर्क प्रमुख संजय खंडागळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे, तालुका संघटक सुरेश देशमुख, युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.
LAtUZhRdPCuVHyD