पाथर्डी । वीरभूमी - 22-Jul, 2022, 01:45 PM
विश्वासार्हता, आपुलकीची सेवा, ग्राहक हित, सोन्याची शुद्धता व आकर्षक व्हरायटी हे या नवीन दालनाची वैशिष्ट्य ठरतील. भव्य वातानुकूलीन, सुसज्ज व असंख्य व्हरायटी असलेले हे दालन पाथर्डीतील सुवर्णपेठेच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे, असे गौरवोद्गार शंकर महाराज मठाचे महंत माधव बाबा यांनी काढले.
पाथर्डी शहरातील नवी पेठ येथील कांचन ज्वेलर्स या सुवर्ण दालनाच्या नूतनीकरण निमित्त आयोजित उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चोरडिया परिवारातील ज्येष्ठ महिला श्रीमती कांचनबाई चोरडिया यांच्या हस्ते फीत कापून ग्राहक सेवेस प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी चोरडिया परिवारातील ज्येष्ठ सदस्य व जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद चोरडिया, सुरेशचंद चोरडिया, शांतीलाल चोरडिया, राजू शेठ चोरडिया, बाजार समितीचे मा. संचालक विजयकुमार लुनावत, उद्योजक रवीशेठ पाथरकर, राज्य सराफ संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य राजुशेठ शेवाळे, सचिन भंडारी निलेश गांधी, राजेंद्र भंडारी, चंदनसिंग दर्जावत, अनिल खाटेर यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.
या फर्म विषयी बोलताना संचालक सचिन चोरडिया व चेतन चोरडिया म्हणाले की, सुवर्णमय शुद्धतेची वैभवशाली परंपरा हे ब्रीद घेऊन आम्ही आजपर्यंत ही सुवर्णसेवेची वाटचाल करत आहोत व यापुढेही नवी प्रीती नवी नाती अशी साद देत पाथर्डी तालुक्यातील जनतेसाठी शुद्ध, हॉलमार्क युक्त व अतिशय नाविन्यपूर्ण डिझाईन मध्ये जे नवीन पिढीला आकर्षीत करतील असे सर्व सोन्याचे दागिने येथे उपलब्ध असणार आहेत.
मागील तीन पिढ्यांपासून पाथर्डीतील ग्राहकांना विविध प्रकारच्या अविरत सेवा देणार्या चोरडिया परिवाराने तालुक्यातील ग्राहकांची मने जिंकली असून ग्राहकांच्या विश्वासात पूर्णपणे उतरलेले व मनावर अधिराज्य गाजवणारे कांचन ज्वेलर्स हे आता नव्या रूपात ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. मागील 30 वर्ष चोख व्यवहार, सोन्याची शुद्धता यासाठी ग्राहकांच्या कसोटीवर खरे ठरले आहे. या नूतनीकरणानिमित्त ग्राहकांना असंख्य व्हरायटीसह दागिन्याच्या खरेदीवर, चांदी वस्तु खरेदीवर, दागिन्यांच्या मजुरीवर विविध सवलती मिळणार आहेत.
सोने चांदीच्या शुद्धतेनुसार दर, नाविन्यपूर्ण डिजाईनचे आकर्षक दागिने, लाईट वेट दागिन्यांची मालिका, हॉलमार्क ची शुद्धता, हिरे जडीत दागिने, अशी विविध वैशिष्ट्ये या दालनाची असतील. एकेकाळी सुवर्ण बाजारासाठी राज्यभर लौकिक असलेल्या पाथर्डी शहरातील सराफ बाजाराला गतवैभव मिळवून देत पाथर्डीकरांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी व पाथर्डीकरांच्या साज श्रृगांरासाठी उत्तमोत्तम आणि अभिनव दागिन्यांचा पर्याय येथे उपलब्ध होणार आहे.
आता ग्राहकांना नगर, पुणे, जळगाव अशा मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. दिवसभर ग्राहकांसह विविध मान्यवरांनी या दालनास भेटी दिल्या.
या प्रसंगी अतिश चोरडिया यांनी सर्वांचे स्वागत केले तर सागर चोरडिया यांनी आभार मानले.
Comments