दादापाटील राजळे महाविद्यालयात करियर गायडन्स शिबिर उत्साहात
तिसगाव । वीरभूमी - 22-Jul, 2022, 01:51 PM
पाथर्डी तालुकतील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांकरिता ‘करिअर अॅडव्हान्समेंट कोर्स’ अंतर्गत वाणिज्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार हा सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यार्थ्यांना एक क्रेडिटसाठी ठरवण्यात आला. या कोर्स अंतर्गत बँकिंग व फायनान्स मधील विविध संधी, बँकिंगच्या परीक्षेची तयारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे. हा यामागील हेतू होता.
राष्ट्रीयीकृत बँकांमधील सेवांच्या संधी विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे समजावून सांगण्यात आल्या. तसेच राष्ट्रीयकृत बँकांमधील नोकरीच्या संधी व त्यातील पदे तसेच त्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, विविध पदांसाठीचा अभ्यासक्रम त्यावरील प्रश्न आणि परीक्षेचे स्वरूप सांगून विद्यार्थ्यांनी त्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि परीक्षेस कशाप्रकारे सामोरे जावे.
याबाबतचे मार्गदर्शन अहमदनगर येथील द्रोणा एज्युकेशनचे संचालक हरीश आर. तावरे यांनी केले. त्यांच्या समवेत अभिषेक महालकर तसेच दिलीप पद्माकर मते उपस्थित होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. दादापाटील राजळे तसेच स्व. राजीव राजळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख यांनी केले. अध्यक्ष सूचना प्रा. कविता वीर यांनी मांडली तर अध्यक्ष सूचनेला प्रा. रामेश्वरी सरोदे यांनी अनुमोदन दिले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. देविदास खेडेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन तृतीय वर्ष वाणिज्य मधील विद्यार्थिनी दिशा पवळे हिने केले तर प्रा. स्वाती सातपुते यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनिका राजळे, रुपेश केदार, यश चिंतामणी, विकास गटकळ, कानिफ दारकुंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
oEcVXtYn