अहमदनगर । वीरभूमी- 09-Aug, 2022, 01:59 PM
जागतिक जैव इंधन दिनानिमित्त (दि. 10 ऑगस्ट) अहमदनगर जिल्ह्यातील सात पुत्रांचा मुंबई येथील सहारा इंटरनॅशनल येथे सन्मान होणार आहे. या सातही भूमिपुत्रांनी आपआपल्या तालुक्यातील एमपीओ ओनर बायो सीएनजी प्रोजेक्टला चिन्हांकित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.
मुंबई येथील सोहळ्यात श्रीरामपूर येथील रणजीत दातीर, पारनेर येथील सुरेश धवण, शेवगाव येथील राजेंद्र गायकवाड, नेवासा येथील भाऊराव चावरे, राहुरी येथील सागर घुगरकर, श्रीगोंदा येथील हेमंत उपरे, अकोला येथील राहुल वारे या भूमिपुत्रांना सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा मुंबई विलेपार्ले येथील हॉटेल स्टारच्या भव्यदिव्य सहभागृहात बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहाने जगभरात जागतिक जैव इंधन दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे मुंबई स्थित मीरा क्लीन फ्यूल्स लिमिटेड कंपनी (MCL मुंबई) गेल्या दहा वर्षांपासून हा दिवस साजरा करीत आहे. भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याकरीता या कंपनी मार्फत मोठ्या प्रमाणात 2030 पर्यंत हे मिशन राबवण्यासाठी ग्रामीण पातळीवर कार्य चालू केले आहे.
इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी कंपनीच्या गुंतवणुकीत यशस्वीपणे सभासद बनवण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील युवा उद्दोजकांनी यशस्वीपणे पार पाडले आहे.
या सन्मान सोहळ्यानिमित्त प्रकल्प उभारणीसाठी MCL सोबत सांमजस्य करार होत असून अहमदनगर जिल्हात जवळपास 300 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. त्यामाध्यमातून प्रकल्पात तयार होणार्या उत्पादनामुळे अहमदनगर जिल्हा बर्यापैकी प्रदूषण मुक्त होऊन, बेरोजगारी मुक्त सुद्धा होईल.
अहमदनगर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पात तयार होणार्या जैव इंधनच्या (बायो सी.एन जी) गॅस, घरगुती गॅस, सेंद्रिय खताच्या वापरामुळे वातावरण प्रदूषण मुक्त होईल. पेट्रोल, डिझेलच्या वापरावर नियंत्रण येईल. त्यामुळे सरकारचे इंधन आयातीसाठी जाणारा पैसा वाचणार आहे. तसेच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी गावागावातील शेतकर्यांना प्रोत्साहन दिले जाईल व त्यांचे उत्पादन गावातच खरेदी केल्या जातील.
त्यामुळे शेतकर्याला चांगला मोबदला चांगला मिळणार आहे. तर नागरिकांना शुद्ध अन्न, शेतीपूरक उद्योगांमध्ये सुद्धा कंपनी अग्रेसर राहुन यातूनही मोठा रोजगार जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे.
जागतिक जैव इंधन दिवसानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा असे संपूर्ण भारतातून दोनशे उद्दोजका सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. लवकरच त्यांच्या प्रकल्प उभारणी करीता सुरुवात केल्या जाणार आहे. कंपनीकडून तब्बल दोनशे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट एमसीएल (MCL)चे आहे.
Comments