अकोले । वीरभूमी- 13-Aug, 2022, 05:49 AM
अकोले तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतच्या सदस्य व थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील राजूर, सातेवाडी, खिरविरे, समशेरपूर, टाहाकारी, विठे, वारंघुशी, पाडाळणे,
जामगाव, मुथाळणे, सावरगाव पाट या राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतींसह बहुतांशी आदिवासी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तालुक्यातील आबीतखिंड, बाभूळवंडी, चिचोंडी,
चिंचावणे, धामनवन, गोंदूशी, करंडी, गुहिरे, जामगाव, कातळापूर,
केळी- कोतुळ, केळी -ओतूर,केळी-रूम्हणवाडी, खिरविरे,केळुंगण,खुंटेवाडी,कोदणी,लव्हाळी-ओतूर,माळेगाव, मान्हेरे, मवेशी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पांजरे,
पळसुंदे, राजूर, पिंपरकणे, सांगवी,
रणद खुर्द व बुद्रुक , समशेरपूर, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेलद, शेणीत, शिरपुंजे बुद्रुक, टाहाकारी, तळे,
तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे, वाकी, वारंघुशी या ४५ ग्रामपंचायत साठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. अशी माहिती तहसीलदार सतिश थेटे व निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले यांनी दिली.
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल.
समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
qlTzYKeNWxRvj