भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त अकोलेत प्रभात फेरी
अकोलेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी मानले आभार
अकोले । वीरभूमी- 14-Aug, 2022, 09:21 PM
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना अकोलेकरांनी जो उत्साह दाखविला तो राज्यात दखल घेण्यासारखा आहे, असे प्रतिपादन अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी यांनी केले.आज अकोले नगरपंचायतच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रभात फेरी चे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत सर्व शाळा, महाविद्यालय, सर्व जाती धर्माचे नागरिक, व्यापारी, विविध संस्था यांना प्रभात फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ.सोनाली ताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मुख्याधिकारी डॉ. विक्रम जगदाळे व सर्व विभागाचे सभापती, नगरसेवक यांनी केले होते.
त्या आवाहनाला अकोले शहरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते. आजी माजी सैनिक, अगस्ती महाविद्यालय, अगस्ती विद्यालय, कन्या विद्या मंदिर,एन सी सी चे विद्यार्थी, करीयर अकेडमीचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी, अकोले शहरातील विविध जाती धर्माचे नागरिक, महिला, व्यापारी यांनी प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते. अगस्ती विद्यालयापासून प्रभात फेरीला भर पावसात सुरुवात होऊन संपूर्ण शहरातून ही प्रभात फेरी मराठी मुलांची शाळेच्या प्रांगणात आली.
या ठिकाणी नगराध्यक्ष सौ.सोनालीताई नाईकवाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठी मुलांच्या शाळेत आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. नाईकवाडी म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली 'हर घर तिरंगा अभियान' सर्वत्र राबविण्यात येत असून त्या अभियानास अकोलेकरांनी ऊत्तम प्रतिसाद दिला. सर्वांनी आपल्या घरावर झेंडा फडकवुन आपले देशा प्रतिची भावना व्यक्त केली.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.विक्रम जगदाळे, सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी व माझे सर्व सहकारी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सभापती व नगरसेवक यांनी रात्र दिवस परिश्रम घेतले. अकोलेकरांनी दिलेला प्रतिसाद हा राज्यात दखल घेण्यासारखा आहे. शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साह भरला. मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. असे म्हणाल्या.
यावेळी नगरपंचायत च्या वतीने सर्व उपस्थित नागरिक, विद्यार्थी यांना केळी व पोहे यांचा नाश्ता देण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष अड. के. डी. धुमाळ, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके, वकील वसंतराव मनकर मुख्याधिकारी डॉ.विक्रम जगदाळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य विभाग सभापती शरद नवले, बांधकाम सभापती सौ वैष्णवी धुमाळ, पाणीपुरवठा सभापती हितेश कुंभार, महिला व बालकल्याण सभापती सौ.प्रतिभा मनकर,
नगरसेवक सागर चौधरी, विमल मंडलिक, आरिफ शेख, सौ.शीतल वैद्य, नवनाथ शेटे, सौ.माधुरी शेणकर, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, सौ.कविता शेळके, श्वेताली रुपवते, प्रदीप नाईकवाडी, विजय पवार,सौ कल्पनाताई सुरपुरीया, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, मेजर तळेकर, मेजर जगताप, मेजर सचिन नवले, मेजर अविनाश झोळेकर, मेजर रहाणे, मेजर ताजने, सतिश सेठ बुब, विजय सारडा,
प्रमोद मंडलिक, चोथवे परिवार, रासने परिवार, तांबोळी परिवार, जाजू परिवार, परशुराम शेळके, मोसिन शेख, रवींद्र शेणकर, अमोल वैद्य, सौ. अंजली सोमणी, सौ.वैशाली जाधव आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
snQVCMpmKofFRcZ