अकोले । वीरभूमी- 29-Sep, 2022, 04:21 PM
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री ना. प्रल्हादसिंह पटेल हे अकोले विधानसभा मतदार संघ दौर्यावर येत असून शेतकरी, महिला व दुर्बल घटकातील नागरीक व आदिवासी समाज सोबत संवाद साधणार आहेत. तसेच आदिवासी समाजासोबत भोजन करणार असल्याची माहिती भाजपा अनुसूचित जनजाती राष्ट्रीय सचिव वैभवराव पिचड व तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री यांचा लोकसभा प्रवास योजनेनुसार तीन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर ना. पटेल येत असून अकोले तालुक्यात एक दिवस प्रवास करणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, लोकसभा प्रभारी आ. राहुल आहेर, प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शिवाजीराजे धुमाळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव उपस्थित राहणार आहेत.
ना.प्रल्हाद पटेल शुक्रवारी सकाळी 10 वा देवठाण येथील दुर्बल घटक व आदिवासी समाजातील व्यक्ती बरोबर सवांद साधणार असून आदिवासी समाजाच्या घरी भोजन करणार आहेत. त्यांचे आदिवासी पारंपरिक नृत्याच्या तालावर स्वागत केले जाणार असल्याची माहिती अरुण शेळके यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी दुपारी 12 वा. आयोजित केलेल्या अकोले महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात महिला मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महिला तालुकाध्यक्ष सौ. रेश्मा गोडसे, शहराध्यक्ष सौ. अंजली सोमणी, सचिव विद्या परशुरामी यांनी केले आहे.
दुपारी 12 वा जनजाती कल्याण आश्रमातील विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. जनजाती कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे, प्राचार्य संतोष कचरे, रामदास सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली.
दुपारी 1.30 वाजता कुंभेफळ ग्रामपंचायत कार्यालय भेट व केंद्रीय योजनाचा आढाव व शेतकर्यांशी संवाद साधारण आहेत, अशी माहिती भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अमोल कोटकर, सुनील कोटकर, सरपंच प्रिया पवार, उपसरपंच भास्कर कोटकर यांनी केले आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अमृतसागर व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
mhDwHiVpS