अहमदनगर लाचलुचपत पथकाची कारवाई
अहमदनगर । वीरभूमी - 09-Nov, 2022, 10:31 PM
घरामध्ये वीजपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेले वीज मीटर जळीत झाल्यानंतर ते बदलून नवीन वीज मीटर जोडणी करुन देण्यासाठी 2800 रुपयाची लाच घेणार्या बाह्यस्त्रोत वायरमनसह बाह्यस्त्रोत ऑपरेटरला रंगहात पकडले. ही कारवाई अहमदनगर लाचलुचपत पथकाने महावितरणच्या निघोज (ता. पारनेर) सेक्शन येथे केली.
लाचलुचपत पथकाने केलेल्या कारवाईमध्ये किशोर बाळासाहेब कळकुटे (वय 23, पद- बाह्यस्त्रोत वायरमन) व विकास अशोक वायदंडे (वय 30, बाह्यस्त्रोत ऑपरेटर, महावितरण निघोज सेक्शन, ता. पारनेर) अशी दोघांना रंगेहात पकडले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे पारनेर तालुक्यातील निघोज शिवारातील शेतामध्ये दोन खोल्यांचे घर आहे. त्या ठिकाणचे इलेक्ट्रीक मीटर जळीत झाल्याने तेथे नवीन मीटर जोडणी करुन देण्यासाठी बाह्यस्त्रोत वायरमन किशोर कळकुटे यांनी 3000 रुपये लाचेची मागणी केली होती.
या लाच मागणीची तक्रार अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरुन लाचलुचपत पथकाने पंचासमक्ष बाह्यस्त्रोत वायरमन किशोर बाळासाहेब कळकुटे यांनी तक्रारदार यांचेकडे 2800 रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम बाह्यस्त्रोत ऑपरेटर विकास अशोक वायदंडे यांचेकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार महावितरणच्या निघोज सेक्शन येथे सापळा लावून पंचासमक्ष आरोपी बाह्यस्त्रोत ऑपरेटर विकास अशोक वायदंडे यांनी बाह्यस्त्रोत वायरमन यांचे सांगणेवरुन सदर लाच रक्कम स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोनि. शरद गोर्डे, पोनि. गहिनीनाथ गमे, पोना. रमेश चौधरी, पो. अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, पो. ह. हरुन शेख यांच्या पथकाने केली.
aRgwZrNDztXKGumv