जेसीबी, डंपरसह दोन आरोपी अटकेत । 26 लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव । वीरभूमी- 11-Nov, 2022, 05:53 PM
शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करणार्यांवर आज शुक्रवारी भल्या पहाटे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये जेसीबी, डंपरसह दोघांना अटक करत तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईने अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मात्र राजरोस सुरु असलेल्या वाळू उत्खननाकडे स्थानिक पोलिस व महसूल प्रशासनाचे का दुर्लक्ष होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पाणी असल्यामुळे नदी पात्रातून अवैध वाळू उपसा बंद आहे. मात्र अवैध वाळू तस्करांनी गोदावरी नद्यांच्या उपनद्या सध्या टार्गेट केल्यामुळे दिवसरात्र वाळू उपसा सुरू असतो. मात्र याकडे स्थानिक महसूल व पोलिस प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
त्यातच तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उत्खनन सुरु असल्याची माहिती शेवगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके गुप्त खबर्याकडून समजली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरील ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सदर पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी 1) अश्पाक सुलेमान शेख याचे ताब्यातून 20 लाख रुपये किंमतीचा एक पिवळ्या रंगाचा जे.सी.बी. आणि आरोपी 2) गणेश चंद्रकांत केदार याचे ताब्यातून 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचा एक आकाशी रंगाचा डंपर व 3 ब्रास वाळू असा एकुण 26 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वरील दोन्ही आरोपी विरुध्द पोकॉ. सचिन काकडे यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गु. क्र. 821/2022, भा. दं. वि. कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाटेवाल, हे.कॉ. सुरेश औटी, पोकॉ. नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे, विलास उकीर्डे यांच्या पथकाने केली.
**Still carrying pain from the past? It’s time to let go.** Se-REM is a powerful self-guided therapy that helps you heal trauma and anxiety using music, mindfulness, and REM brain activity. Used by thousands worldwide—download it once, and share it with others. **Visit [Se-REM.com](http://se-rem.com) and start your healing journey today.**