पारनेर । वीरभूमी- 16-Nov, 2022, 12:46 AM
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पारनेर तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहोकडी येथे खो-खो खेळाने सुरूवात झाली. विविध वयोगटात पार पडलेल्या या स्पर्धेत कोहोकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा येथील धर्मनाथ विद्यालय व अळकुटी येथील साईनाथ विद्यालय यांनी आपापल्या गटात दुहेरी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेला जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई लंके, माजी सभापती सुदाम पवार, सरपंच डॉ. साहेबराव पानगे यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
तर दुसर्या दिवशी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, शिक्षक संघाचे राज्य प्रतिनीधी आबासाहेब दळवी, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक कारभारी बाबर, संचालक सुर्यकांत काळे, शिक्षक नेते रवींद्र रोकडे, केंद्रप्रमुख दौलत येवले, केंद्रप्रमुख रावजी केसकर, साधनव्यक्ती सुरेश सोनवणे, युवराज हिलाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय झरेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर्जेराव चौधरी, सेवा सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र चौधरी, दगडू थोरात, तुळशीराम गायकवाड, वसंत चौधरी यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला.
दोन दिवस अतिशय उत्कृष्ट आणि नेटक्या नियोजनात कोहोकडी प्राथमिक शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहोकडी, धर्मनाथ विद्यालय जवळा, साईनाथ विद्यालय अळकुटी या संघाचे वर्चस्व दिसून आले. दोन दिवस उत्साही वातावरणात रंगलेला खो-खो स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना पहायला मिळाला.
संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट आणि बहारदार समालोचन अनिल जाधव व गणेश कोहोकडे यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पारनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष बापूराव होळकर, क्रीडा शिक्षक सुनील गायकवाड, भाऊसाहेब धावडे, गोकुळ कळमकर तसेच कोहोकडी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे, शिक्षक राजेंद्र वाबळे, संतोष गाजरे, आशा आननकर, उज्वला काळे, वैशाली औटी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे- 14 वर्षांखालील (मुली)- 1) जि. प. प्राथमिक शाळा, कोहोकडी (विजेता), 2) जि.प.प्राथमिक शाळा, पानोली- (उपविजेता).
17 वर्षांखालील (मुली)- 1) धर्मनाथ विद्यालय, जवळा- (विजेता), 2) भैरवनाथ विद्यालय, पळवे- (उपविजेता). 19 वर्षांखालील (मुली)- 1) साईनाथ हायस्कूल, अळकुटी (विजेता), 2) महात्मा फुले विद्यालय, भाळवणी (उपविजेता).
14 वर्षांखालील (मुले)- 1) जि. प. प्राथमिक शाळा, कोहोकडी (विजेता), 2) साईनाथ हायस्कूल, अळकुटी (उपविजेता).17 वर्षांखालील (मुले)- 1) धर्मनाथ विद्यालय, जवळा, (विजेता), 2) ढोकेश्वर विद्यालय, टाकळी ढोकेश्वर (उपविजेता)
19 वर्षांखालील (मुले)- 1) साईनाथ विद्यालय, अळकुटी (विजेता), 2) न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर (उपविजेता) याप्रमाणे आहेत.
wiGJQoHFdt