शेवगाव । वीरभूमी - 24-Nov, 2022, 12:36 AM
लोकांना दिलेला शब्द पाळणे ही घुले घराण्याची परंपरा आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या माध्यमातून उभी राहीलेली विकासकामे हे लोकांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या लोकार्पण प्रसंगी डॉ. घुले बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सुर्यभान झाडे, वडुले बुद्रुकचे सरपंच प्रदिप काळे, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष रघुवीर उगले, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, सुदाम झाडे, रमेश कापरे, सर्जेराव निकम, रवींद्र सातपुते, चंद्रभान झाडे, अमोल नजन, आदीनाथ कापरे, आदीनाथ देवढे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी क्षितीज घुले म्हणाले की, घुले बंधूंच्या माध्यमातून ढोरा नदीवर उभा राहीलेली बंधार्याच्या मालिकेमुळे परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे.शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा नेण्याची लोकनेते स्व. मारूतराव घुले यांची शिकवण असल्याने, रिकाम्या हाताने कधीच कोणत्या गावात गेलो नाही.
कोणतेही मोठे पद नसताना तालुक्यातील गावागावात रस्ते, सभामंडप, शाळाखोल्या, अंगणवाडी, आरोग्य केंद्र इमारती, स्मशानभूमी अशी लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठे कामे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या व पंचायत समितीच्या माध्यमातून उभी राहीली आहेत, याचे समाधान आहे. ग्रामस्थांनी आता आपला परका भेद ओळखण्याची वेळ आली आहे.
यावेळी रावसाहेब निकम, नंदकिशोर नजन, साहेबराव निकम, सिताराम झाडे, दत्तात्रय खरड, दत्तात्रय नजन, श्रीधर सातपुते, समीर शेख, बळीराम काकडे, सुरेश म्हस्के, रावसाहेब जाधव, सर्जेराव सातपुते, सतीश म्हस्के, मुन्ना शेख, विकास कराळे, संदीप म्हस्के, पप्पू म्हस्के, मनोज गोर्डे, अमोल गव्हाळ, शरद कळकुंबे, बळीराम काळे, सुरेश सातपुते, प्रमोद शेळके, देवदान कांबळे, रोहन साबळे, रमेश सातपुते, लक्ष्मण सातपुते, सतीश नजन, सोमनाथ सातपुते व ग्रामसेवक संदीप थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक संदिप झाडे यांनी केले तर कृष्णा सातपुते यांनी आभार मानले.
OafItJboeidyX