वीज अधिकार्यांच्या 30 संघटना होणार सहभागी
मुंबई । वीरभूमी - 09-Dec, 2022, 03:18 PM
वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील वीज कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या 30 संघटना सहभागी होणार आहेत.
वीज कर्मचारी संघटना 19 डिसेंबर पासून बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास 18 जानेवारी 2023 पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वीज उद्योगाचे खाजगीकरण धोरण रद्द करावे, जलविद्यूत केंद्र खाजगी उद्योगांना देण्याचे धोरण रद्द करावे. यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.
या संपामध्ये वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता यांच्या प्रमुख 30 संघटना सहभागी होणार आहेत. वीज कर्मचारी या प्रश्नावर मागील काही वर्षापासून आवाज उठवत आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा एकदा बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.
यानुसार दि. 19 डिसेंबर 2022 पासून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्यास 18 जानेवारी 2023 पासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मुकबधिरकाम कंपनी आहे