मंजुरीसाठी ना. गडकरी यांच्यासह खा. विखे यांचे सहकार्य ः आ. मोनिका राजळे
पाथर्डी । वीरभूमी - 13-Dec, 2022, 10:13 PM
केंद्रीय मार्ग निधी (Central Road Fund) अंतर्गत पाथर्डी (pathardi) तालुक्यातील तीन प्रमुख जिल्हा मार्ग (District Road) रस्त्यांच्या सुधारणा करणे या कामासाठी 9 कोटींच्या कामांना दि. 12 डिसेंबर 2022 रोजी मंजूरी मिळालेली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आ. मोनिकाताई राजळे (Monica rajale) यांनी दिली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दि. 22 जून 2022 रोजी पाथर्डी तालुक्यातील तीन प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या सुधारणा करणे कामांसाठी निधी मिळावा, यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार या कामांना मंजूरी मिळाली, ही कामे मंजूर होणेसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.
यामध्ये अमरापुर-सुसरे-सोमठाणे प्रजिमा-30 या रस्त्यासाठी 4 कोटी, जवखेडे-कासार पिंपळगाव रस्ता प्रजिमा-163 या रस्त्यांसाठी 2.50 कोटी त्याचबरोबर कोरडगाव-बोधेगाव रस्ता प्रजिमा-39 या रस्त्यासाठी 2.50 कोटी असे 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
या तीनही रस्त्यांची सुधारणा करणेसाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मागील वर्षीही केंद्रीय मार्ग निधी मधून दुलेचांदगाव- वसुजळगाव- कोरडगाव रस्ता तसेच पाथर्डी-धामगाव- मढी रस्ता व खानापुर-रावतळे-कुरुडगांव - राक्षी ते ठाकुर निमगांव या रस्त्यांची कामे मार्गी लागलेली आहेत.
या सर्व रस्त्यांच्या मंजूरीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आमदार मोनिका राजळे व सबंधीत गावातील नागरीकांनी आभार मानले आहेत.
IqVLujaBWy