शेवगाव । वीरभूमी- 20-Dec, 2022, 12:25 PM
शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयात आज मंगळवारी मतमोजणी झाली. जनतेतून सरपंचपद निवडण्यात येणार असल्याने कोण विजयी होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये राष्ट्रवादी, भाजपाने गड राखले तर, जनशक्तीला 1 सरपंचपदावर विजय मिळवता आला. तर रावतळे-कुरुगावचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकला नवनाथ कवडे यांनी अलिप्त असल्याचे सांगितले.
सरपंचपदाची जनतेतून निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये प्रभुवाडगाव, खामगाव, जोहरापूर, खानापूर, भायगाव, रांजणी, दहिगावने, वाघोली, सुलतानपूर, अमरापूर येथे निवडणूक झाली. आखेगाव सरपंचपदावर जनशक्ती विकास आघाडीचा विजय झाला. तर कुरुगाव-रावतळे येथे चंद्रकांत नवनाथ कवडे यांनी अलिप्त असल्याचे सांगितले.
सरपंचपदाचे विजयी उमेदवार- ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव (प्रभुवाडगाव), विद्या अरूण बडधे (खामगाव), स्नेहल रोहन लांडे (जोहरापूर), शितल मंगेश थोरात (खानापूर), मनिषा राजेंद्र आढाव (भायगाव), काकासाहेब मुरलीधर घुले (रांजणी), सुनिता देवदान कांबळे (दहिगाव-ने) असे आहेत.
सरपंचपदाचे विजयी उमेदवार- सुश्मिता उमेश भालसिंग (वाघोली), सविता विजय फलके (सुलतानपूर), आशाताई बाबासाहेब गरड (अमरापूर) असे आहेत. तर जनशक्ती आघाडीचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार - आयोध्या शंकर काटे (आखेगाव) असे आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली. निकाल जाहीर होताच तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात होता. विजयी उमेदवारांचे अभिनंदन होत आहे.
मागील काही महिण्यापासून जनशक्तीचे अॅड. शिवाजीराव काकडे व जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी तालुक्यात प्रत्येक गावात जावून संघटन वाढविले. त्याचा परिपाक म्हणुन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनशक्तीचे खाते खोलत आखेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विजय मिळवता आला. तर राष्ट्रवादी व भाजपाने आपआपले गड राखले आहे.
EhFJWAKSg