कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते । 6 ग्रामपंचायत भाजपाकडे तर दोन राष्ट्रवादीच्या ताब्यात ः तालुकाध्यक्षाचा दावा
कर्जत । वीरभूमी- 20-Dec, 2022, 05:31 PM
कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले असून यामध्ये भाजपाने 6 ग्रामपंचायतीवर दावा ठोकला असून राष्ट्रवादी काँग्रेसने 2 ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरच्या निवडणुकीस महत्व प्राप्त झाले होते. भाजपा आणि आ राम शिंदेसाठी हा विजय नवसंजीवनी देणारा असेल तर आ. रोहित पवारांसाठी आत्मचिंतन करणारा ठरेल. अळसुंदे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या 15 वर्षाच्या सत्तेस फटका बसला. याठिकाणी भाजपाने त्यांना सरपंचपदासह पॅनलला देखील धोबीपछाड दिली.
मंगळवार, दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. अवघ्या अर्ध्या तासात एकूण चार फेरीत 8 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी उपस्थित मतमोजणी प्रतिनिधी कक्षातून बाहेर पडताना विजयाची खूण करताच बाहेर जमलेले कार्यकर्ते गुलालात रंगून जात जल्लोष करीत होते. शेवटी विजयी उमेदवारांनी कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराजांच्या मंदिरात वाजत-गाजत मिरवणुकीने जात दर्शन घेतले.
भाजपाने बहिरोबावाडी, कापरेवाडी, अळसुंदे, मुळेवाडी, म्हाळगी आणि कौडाने ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकल्याचे सांगितले तर कोपर्डी आणि निंबे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राखले.
ग्रामपंचायत निहाय सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : 1) बहिरोबावाडी : कोमल शरद यादव 1299 (सरपंच विजयी), सचिन लाळगे 361, प्रियंका नितीन तोरडमल 326, स्वाती भागवत तोरडमल 328 तर एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने आशा किसन तांदळे, नवनाथ लष्कर, स्वप्नील शिंगाडे, स्वाती गहिनीनाथ पठाडे, चंद्रशेखर पठाडे आणि चंद्रकला प्रभाकर तोरडमल यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.
2) अळसुंदे : स्मिता जिजाबापू अनारसे 1554 (सरपंच विजयी), रेवननाथ अनारसे 522, शीतल बाळासाहेब अनारसे 562, साधना रंगनाथ अनारसे 564, शिवाजी देशमुख 421, सविता भाऊ लोंढे 407, बायडाबाई हनुमंत खरात 402 (ईश्वर चिठ्ठीद्वारे विजयी घोषित), जीवन साळुंके 249, माधुरी अनिल गाडे 209, आदिनाथ आढाव 359, आण्णा साळुंके 391, सुनीता उत्तम देवकाते 358.
3) कापरेवाडी : अनिल खराडे 1165 (सरपंच विजयी), दत्तात्रय मोडके 333, सविता नवनाथ मोडके 350, मंगल रमेश रोकडे 277, निकेश तोरडमल 417, शीतल मच्छिंद्र खराडे 436, रतन चंद्रकांत मुळे 420, योगेश कापरे 265, महेंद्र शिंदे 239, अविद्या नामदेव कदम 260.
4) कोपर्डी : शांतीलाल सुद्रीक 819 (सरपंच विजयी), संतोष गांगर्डे 310, पूनम तात्या शिंदे 323, कल्पना राहुल सुद्रीक 307, अंकुश शिंदे 310, अर्चना अशोक सुद्रीक 326, जयश्री दत्तात्रय सुद्रीक 305, लक्ष्मण कानडे 252, गणेश सुद्रीक 231, सुरेखा सुभाष सुद्रीक 243.
5) मुळेवाडी : शीतल दत्तात्रत मुळे 534 (सरपंच विजयी). किरण सतीश जगधने 261, सुजाता संतोष गरड 228, मेघा सतीश मुळे 233, सोमनाथ मुळे 150, कविता पाराजी मुळे 145, नितीन जगताप 175, राणी तानाजी मुळे 186.
6) म्हाळगी : शांतीलाल मासाळ 1083 (सरपंच विजयी), गहिनीनाथ डोंबाळे 470, अक्कुबाई दादासाहेब मासाळ 442, गजराबाई बाळासाहेब पारखे 450, मनीषा आप्पा साळवे 401, संदीप शेगडे 438, यमुना रंगनाथ नलवडे 436, सुनील जगताप 387, राणी सचिन वाघमारे 433, सुन्नाबी मेहबूब बागवान 407.
7) कौडाने : प्रमोद सुद्रीक 671 (सरपंच विजयी), संजय शंकर गंगावणे 281, कविता आप्पासाहेब सुद्रीक 254, आरती शहाजी सुद्रिक 250, शिवाजी सुद्रिक 332, जनाबाई भाऊसाहेब सुद्रिक 319, अंकुश शिंगाडे 145, स्मिता अशोक गायकवाड 161,
8) निंबे : बाळूबाई बाबासाहेब कोपनर 351 (सरपंच विजयी). विश्वनाथ खामगळ 127, राणी भाऊसाहेब पारेकर 122, रंजना गोविंद खामगळ 137, तुकाराम जरक 152, उर्मिला बाबासाहेब गलांडे 142, तात्यासाहेब बेरगळ 115, राणी अशोक भिसे 117,
Comments