जनतेतून सरपंच निवडीमुळे सदस्यांची संख्या समान । निर्माण झाला होता पेच
अहमदनगर । वीरभूमी- 22-Dec, 2022, 01:48 PM
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकीत सरपंच (sarpanch) हे पद जनतेतून निवडले गेल्याने सदस्य संख्या सम प्रमाणात झाली आहे. यामुळे उपसरपंच (Deputy Sarpanch) निवडीमध्ये लोकनियुक्त सरपंचाला (People Appointed Sarpanch) मत देण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाने (Village Development Department) देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे उपसरपंच निवडीदरम्यान होणारा पेच टळणार आहे.
नुकत्याच अहमदनगर (Ahemednagar) जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतीसह राज्यातील विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) पार पडल्या. या निवडणुकांमधून जनतेतून सरपंच (sarpanch) निवड करण्यात आली. जनतेतून सरपंच (sarpanch) निवडीमुळे ग्रामपंचायत सदस्य संख्या सम प्रमाणात आल्याने उपसरपंच निवडीचा (deputy sarpanch election) पेच निर्माण झाला होता.
यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांची संख्या विषम असल्याने आणि सरपंच व उपसरपंच यांची निवड एकाचवेळी केली जात असल्याने असा पेच निर्माण होत नव्हता. मात्र आता जनतेतून थेट सरपंच निवडला गेल्याने उपसरपंच निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
मात्र याबाबत ग्रमविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून कळविले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 33 नुसार उपसरपंच निवडीची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे.
यानुसार उपसरपंच निवड ही जनतेतून निवडलेल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. लोकनियुक्त सरपंचाला उपसरपंच निवडीत आपल्या इच्छेनुसार मत देण्याचा अधिकार दिला आहे.
या अधिकारामुळे उपसरपंच निवडीत समान मते पडल्यास लोकनियुक्त सरपंचाचे मत निर्णायक ठरणार आहे. यामुळे उपसरपंच निवडीतील पेच दूर झाला आहे.
जनतेतून सरपंच निवडला गेल्या नंतर उपसरपंचाची निवड ही वेळेत पूर्ण करावी लागणार आहे. तसेच काही कारणाने उपसरपंच निवड काही कारणाने तहकूब करावी लागल्यास लगेच दुसर्या दिवशी निवडीसाठी बैठक बोलवावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे निवडी दरम्यान सरपंच हे काही कारणास्तव गैरहजर राहिल्यास पीठासीन अधिकार्यांची नेमणूक करून उपसरपंचाची निवड करण्यात येणार आहे. यामुळे उपसरपंच निवडीचा पेच सुटला आहे.
Comments