शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार व इंधन निर्मिती होणार - रंणजीत दातीर
शेवगाव । वीरभूमी - 25-Jan, 2023, 02:50 PM
मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड अंतर्गत ग्रिन गोल्ड क्लीन फ्युएल प्रा. लि. व ग्रिन गोल्ड ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यात नेपिअर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा बनवण्याची पहिली फॅक्टरी तळणी या गावात उभारण्यात येत आहे. या फॅक्टरीचा आज 26 जानेवारी 2023 रोजी शुभारंभ होत आहे. या माध्यमातून शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार व इंधन निर्मिती होणार असल्याची माहिती रणजित दातीर यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील तळणी परिसरातील 10 किलोमीटर अंतरावरील सभासद शेतकर्यांचे नेपिअर गींनी गवत कंपनी हमीभावाने खरेदी करणार आहे. मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व ग्रिन गोल्ड ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सोबत अनेक गावचे ग्राम उद्योजक जोडले गेले आहेत. तसेच 10 हजार पेक्षा जास्त शेतकरी सभासद झाले आहेत.
तळणी गावातील प्लांट मध्ये जवळपास 50 कर्मचार्यांची कंपनी अॅक्ट नुसार नेमणूक केली जाणर असून, तोडणी वाहतूकसाठी ही नोकरदार नेमणूक व वाहन कंत्राट केले जाणार आहेत. रोज 100 टन नेपिअर गवताची या प्लांटमध्ये प्रक्रिया होणार असून त्यापासून 30 टन नैसर्गिक कोळसा तयार होणार आहे.
सध्या कंपनीकडे दररोज हजारो टन नैसर्गिक कोळसाची ऑर्डर आहे. शेवगाव तालुक्यात पुढील काळात नैसर्गिक कोळसाचे प्लांट याच पद्धतीने उभे केले जाणार आहेत. हा उत्तम दर्जाचा कोळसा असून यामुळे प्रदूषण होणार नाही. हा दगडी कोळसा, फरनेस ऑइल, या पद्धतीच्या जीवाष्म इंधनाला इकोफ्रेंडली पर्याय उभा रहाणार आहे.
नैसर्गिक कोळसा हा वीज निर्मिती, फौंड्री व्यवसाय, हॉटेल व्यवसायीक, कापड उद्योग यांच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे. जैव इंधन निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, इकोफ्रेंडली प्रॉडक्ट, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेती उत्पादने असे वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी शेतकर्याच्या सोबत जोडली गेली आहे.
कंपनी मधील व्यवसाय फायद्यातील 20 टक्के रक्कम तालुक्याच्या विकासासाठी खर्च केली जाणार आहे. या माध्यमातून तालुक्यात शेतकर्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या कंपनीचा शुभारंभ 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करुन केली जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता कंपनी व प्रोडक्ट याबाबत माहिती दिली जाणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कंपनीचे प्राईम बी. डी. ए. रणजित दातीर, शेवगाव तालुका एमपीओ गजानन भोगे व एमपीओ राजेंद्र गायकवाड, संचालक दत्तात्रय फुंदे व भाऊसाहेब पाचरणे यांनी केले आहे.
75bpx8