शेवगाव । वीरभूमी - 03-Mar, 2023, 11:23 AM
शेवगाव तालुक्यातील अमरापूर व नेवासा तालुक्यातील देडगाव येथून ट्रॅक्टर चोरी गेल्याची शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा शेवगाव पोलिसांनी तपास करत दोन ट्रॅक्टरसह दोघे आरोपी जेरबंद करत 8 लाखांचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
अटक केलेले आरोपी पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथील आहेत. या आरोपींची नावे राजेंद्र बाबासाहेब पटारे व कालिदास दत्तात्रय टकले अशी आहेत.
अमरापूर येथील अरुण भगवान बोरुडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं.208/2023 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे तसेच देडगाव (ता. नेवासा) येथील संदिप गंगाधर चेडे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं.209/2023 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रमाणे सलग दोन गुन्हे दाखल झाल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदशनाखाली पोनि. विलास पुजारी यांनी सपोनि. विश्वास पावरा व सपोनि. रविंद्र बागुल यांचे दोन विषेश पथके तयार करुन चोरीच्या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले.
याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन शेवगाव पोलिसांनी आरोपी राजेंद्र बाबासाहेब पटारे (रा. हत्राळ, ता. पाथर्डी) यास आखेगाव चौक, आखेगाव या ठिकाणी सापळा लावुन ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने साथीदार कालीदास दत्तात्रय टकले (रा. हत्राळ, ता. पाथर्डी) याचेसह दोन्ही ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी कडुन दोन गुन्हयातील चोरीतील 8 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर असा मुद्देमाल हस्तगत करत दोघा आरोपींना जेरबंद केले आहे.
सदरची कामगिरी पोनि. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील सपोनि. रविंद्र बागुल, सपोनि. विश्वास पावरा, पोहेकॉ. बाबासाहेब शेळके, पोहेकॉ. नेताजी मरकड, पोहेकॉ. परशुराम नाकाडे, पोना. भनाजी काळोखे, पोकॉ. शिरसाठ, पोकॉ. अमोल ढाळे, पोकॉ. संपत खेडकर, पोकॉ. राजेंद्र ढाकणे, पोकॉ. अस्लम शेख, पोकॉ. बप्पासाहेब धाकतोडे, चापोहेकॉ. मन्याळ, चापोना. रविंद्र शेळके, पोना. सोमनाथ घुगे, पोना. संभाजी घायतडक यांच्या पथकाने केली.
Comments