एकविरा महिला क्रिकेट चषक जिजाऊ ब्रिगेडने पटकावला
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते बक्षिस वितरण । एकविराच्या स्पर्धांमध्ये 733 महिला खेळाडूंचा सहभाग
संगमनेर । वीरभूमी - 02-Apr, 2023, 01:07 PM
कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर मध्ये आयोजित केलेल्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट रस्सीखेच व बुद्धिबळ स्पर्धांमध्ये तालुक्यातील 733 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून क्रिकेट सामन्यांमध्ये महिला खुल्या गटातून जिजाऊ ब्रिगेडने प्रथम पुरस्कार मिळाला तर महाविद्यालयीन गटात अमृतवाहिनी बी. फार्मसी कॉलेजने मानाचा चषक पटकावला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला क्रिकेट सह बॅडमिंटन, रस्सीखेच व कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उत्कर्षाताई रुपवते, अॅड. ज्योती मालपाणी, निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई दिघे,
स्वाती शहा, अर्चना आसोपा, सुनीता कांदळकर, वृषाली साबळे, ज्योती थोरात, शर्मिला हांडे, तृष्णा औटी, अहिल्या ओहोळ, शिवानी वाघ, किरण गुंजाळ, पूजा गाडेकर, सुरभी आसोपा, सुरभी मोरे, मयुरी थोरात, गायत्री थोरात, श्रद्धा कढणे, प्रणाली राऊत, आदीश्री झवर, मिताली भडांगे, कल्याणी काकड, पूजा थोरात, आदिती खोजे, अंबादास आडेप, अॅड. सुहास आहेर, निखिल पापडेजा, जयवंत अभंग, डॉ. सुनील सांगळे, सत्यजित थोरात, मिलिंद औटी, पराग थोरात, गणेश मदास आदींसह एकवीराच्या विविध महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, एकविराच्या वतीने झालेल्या या महिला स्पर्धांमध्ये मुलींचा सहभाग कौतुकास्पद राहिला आहे. मुली या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने असून पुढील काळात या स्पर्धा आणखी भव्य दिव्य होतील असा विश्वास व्यक्त करताना यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले. आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एक वेळा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील चार वर्षात महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिलांच्या या स्पर्धांमध्ये तीन वर्षाची मुलगी ते 61 वर्षाच्या आजींचा नोंदवलेल्या सहभाग हेच या स्पर्धेच्या यशस्वीतेचे वैशिष्ट्य आहे.
या स्पर्धेत क्रिकेटमधून खुल्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिजाऊ ब्रिगेड यांनी पटकावला. त्यांना एकविरा चषक व 7777 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय पुरस्कार रुक्मिणी ग्राम संघ संगमनेर यांनी पटकावला त्यांना एकविरा चषक व 5555 रुपये, तर तृतीय क्रमांक संगमनेर आशा सेविका संघाने पटकावला त्यांना एकविरा चषक व 3333 रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयीन गटात रवीशंकर अकॅडमी प्रथम, अमृतवाहिनी फार्मसी कॉलेज द्वितीय, तर सह्याद्री कॉलेजने तृतीय क्रमांक मिळविला, शालेय गटात अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल प्रथम, सह्याद्री विद्यालय द्वितीय व दत्त विद्यालय जवळे कडलग यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
बॅडमिंटन स्पर्धेत शालेय गटात पलक धनगर प्रथम क्रमांक, समृद्धी देशमुख द्वितीय क्रमांक, समीक्षा कुटे तृतीय क्रमांक, तर महाविद्यालयीन गटात सुरभी गिरी प्रथम क्रमांक ,साक्षी पवार द्वितीय क्रमांक, गायत्री क्षत्रिय तृतीय क्रमांक, खुल्या गटात हर्षदा कटारे प्रथम क्रमांक, शर्वरी बोरसे द्वितीय क्रमांक, समृद्धी वाणी तृतीय क्रमांक, मिळवला. रस्सीखेच मध्ये शालेय गटात सराफ विद्यालय प्रथम क्रमांक, दत्त विद्यालय जवळेकडलग द्वितीय क्रमांक, तर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल तृतीय क्रमांक, महाविद्यालयीन गटात सह्याद्री कॉलेज प्रथम क्रमांक, एसएमबीटी डेंटल कॉलेज द्वितीय क्रमांक, तर अमृतवाहिनी फार्मसी कॉलेज तृतीय क्रमांक, महिला खुल्या गटात योगानंद सुपरमन संगमनेरने प्रथम क्रमांक मिळवला.
जिजाऊ ब्रिगेडने द्वितीय तर सराफ विद्यालय शिक्षिका यांनी तृतीय क्रमांक मिळवला. महिला कुस्ती स्पर्धेत प्राची गुंजाळ, सायली शेळके, आदिती एखंडे यांनी विजेतेपद पटकावले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 7777 द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना 5555 व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना 3333 रुपये आणि प्रत्येक संघाला एकविरा चषक देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वृषाली साबळे यांनी केले तर ज्योती थोरात यांनी आभार मानले.
9itcuc