शेवगाव । वीरभूमी- 19-May, 2023, 06:12 PM
तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज अखेर 49 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. गुरुवारी 25 जणांनी 26 अर्ज दाखल केले होते. तर आज 15 जणांनी 23 अर्ज दाखल केले.
आतापर्यंत सर्वाधिक अर्ज हे भटक्या विभक्त जाती/जमाती विमुक्त मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दाखल झाले आहेत. तर उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी गटात प्रताप बबनराव ढाकणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता. गुरुवारी 25 जणांनी 26 तर आज शुक्रवारी 15 जणांनी 23 असे एकुण 49 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी गटातून प्रताप बबनराव ढाकणे यांनी तब्बल 4 अर्ज दाखल केले आहेत. मात्र या गटात एकमेव त्यांचे अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वसाधारण जागेसाठी 1) बोधेगाव गटातून- अंबादास किसन खेडकर, 2) हातगाव गटातून - चरणसिंग हरिसिंग राजपूत, विठ्ठल शंकर बर्गे, अशोक बाबुराव अभंग, हरिचंद्र विठ्ठल घाडगे, 3) मुंगी गटातून - रमेश नवनाथ केदार, लक्ष्मण गंगाराम टाकळकर, मारोती तात्याबा मोडके (दोन अर्ज), 4) चापडगाव गटातून - ज्ञानदेव विठ्ठल कातकडे, 5) हसनापूर गटातून- काशिनाथ वामन चेमटे (दोन अर्ज) यांनी अर्ज दाखल केले.
उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी- प्रताप बबनराव ढाकणे (तीन अर्ज), महिला प्रतिनिधी- कमलबाई काशिनाथ चेमटे (दोन अर्ज). भ. वि. जाती/जमाती वि.मा. प्रवर्ग- काशिनाथ वामन चेमटे (दोन अर्ज), सतीश रामराव गव्हाणे (दोन अर्ज), रमेश नवनाथ केदार, बाळासाहेब अंबादास खेडकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
दाखल अर्जावर सोमवार दि. 22 मे रोजी छाननी होणार आहे. छाननी नंतर दि. 23 रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्यात येणार असून दि. 6 जुन पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास 19 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगरचे डॉ. प्रवीण लोखंडे हे काम पहात असून त्यांना गहिनीनाथ विखे हे सहाय्य करत आहेत.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर प्रताप ढाकणे यांची सत्ता आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत ढाकणे गटाने सर्व जागांवर आपले उमेदवार दिले असून काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र विरोधी भाजपाच्या गोटात निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर शांतता दिसून येत आहे.
BIszNvLJMPedoHO