बुवासाहेब नवले पतसंस्थेवर नवलेंचे वर्चस्व कायम
मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वात जिंकल्या सर्वच्या सर्व जागा
अकोले । वीरभूमी - 12-Jun, 2023, 01:53 PM
पतसंस्था चळवळीत अग्रगण्य असलेल्या बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखालील अगस्ति सहकार मंडळाचे सर्वच्या सर्व 19 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या मंडळाच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.
सर्वच्या सर्व जागांवर सत्ताधारी मंडळाचे सर्वच सर्व उमेदवार रांचा दणदणीत विजय झाला तर विरोधी उमेदवारांना सभासदांनी नाकारले. बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शनिवारी 36 टक्के मतदान झाले. आज रविवारी येथील कन्या विद्या मंदिर येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. 19 जागांसाठी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
भटक्या विमुक्त जाती मतदार संघातुन भास्कर दराडे व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष रमेश जगताप हे दोघेही यापूर्वी बिनविरोध निवडून आले.
सत्ताधारी अगस्ति सहकार पॅनलचे सर्वसाधारण मतदार संघातील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- मधुकरराव लक्ष्मण नवले (2337), आनंद निवृत्ती नवले (2354), सूर्यभान सुदाम नाईकवाडी (2369), दिलीप उमाजी मंडलिक (2293), विक्रम एकनाथ मंडलिक (2241), मुरलीधर सीताराम शेणकर (2328), प्रतिभा भास्कर घुले (2357), सुजित गुलाब नवले (2367), रामदास लक्ष्मण शेटे (2354), अनिल जनार्दन गायकवाड (2383), महादू गौराम ताजने (2382), साईनाथ भाऊसाहेब नवले (2349), भागवत रावसाहेब शेटे (2371), विठ्ठल ममताजी धुमाळ (2380), प्रकाश अण्णासाहेब देशमुख (2362), शिवाजी आनंदा चौधरी (2396), विरोधी उमेदवार-कैलास पुंजाजी नवले (417), शंकर सयाजी धुमाळ (273), मनोहर नामदेव नवले (356), महिला राखीव मतदार संघ-सत्ताधारी उमेदवार-मंदाबाई मुरलीधर नवले (2300), संगीता कोंडीराम चौधरी (2391), विरोधी-नलिनी कमलाकर नवले (451) इतर मागासवर्ग-सत्ताधारी-रामदास विठ्ठल धुमाळ (2382), विरोधी-शंकर सयाजी धुमाळ (273) यातील शंकर धुमाळ यांनी इतर मागासवर्ग व सर्वसाधारण मतदार संघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र माघारी नंतर त्यांनी सत्ताधारी अगस्ति सहकार पॅनलला पाठिंबा दिला होता.
आज दुपारी निकाल घोषित झाल्यावर अगस्ति सहकार मंडळाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाकयांची आतिषबाजी केली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी काम केले त्यांना श्री. कापसे व अन्य कर्मचार्यांनी यांनी सहाय्य केले. विजयी सभेत मधुकरराव नवले यांनी मतदारांचे ऋण निर्देश करत संस्थेच्या सभासदांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
पतसंस्थेची निवडणूक लादणार्या विरोधी उमेदवारांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. व नवलेवाडी गावाच्या परंपरेचा आढावा घेत गावाला, पतसंस्थेला बाधा आणनार्या सर्व अपप्रवृत्ती ला थारा दिला जाणार नाही असा इशारा दिला. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केला. यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत माहिती देत सर्व व्यवहार पारदर्शी असून विरोधकांनी अभ्यास न करता आरोप केले होते. त्यांना उत्तरे देण्याइतके ते मोठे नाही असा टोला लगावला.
यावेळी माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, प्रा.विलासराव नवले, रमेशराव जगताप आदींची भाषणे झाली. यावेळी बुवासाहेब नवले मल्टिस्टेट चे चेअरमन विक्रम नवले, शिवाजी नेहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, सभासद, ग्रामस्थ, सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ,जनरल मॅनेजर दादाभाऊ झोळेकर, विलास दादा नवले, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र नाईकवाडी यांनी केले तर आभार अशोक मंडलिक यांनी मानले.
CuwJcZIs