भाजप सरकारची महीला विरोधी धोरणे राजळेंनी पटवून द्यावित ः प्रभावती ढाकणे
पाथर्डी । वीरभूमी - 12-Jun, 2023, 02:10 PM
राजकारणात महिलांचा सहभाग वाढवावा यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या संकल्पनेतुन सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने आज महिला सक्षमपणे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.योगीता राजळेंना मिळालेले पद त्यांनी महिलांचे संघटन करण्यासाठी प्रयत्न करून जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन मा.जि.प. सदस्या सौ.प्रभावती ढाकणे यांनी केले.
माजी जि. प. सदस्या योगीता राजळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आयोजीत सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्षा सविता भापकर, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, माजी नगरसेविका ज्योती बोरूडे, मनिषा ढाकणे, ज्योती जेधे, दिपाली आंधळे, संगीता शेटे, सुवर्णा कोकाटे, संगीता जेधे, शितल शेटे, मिना सदावर्ते, शाहीन आतार आदी उपस्थित होते.
सौ.ढाकणे म्हणाल्या भाजप सरकारच्या मागील नऊ वर्षात प्रचंड महागाई वाढली त्यामुळे गृहीनी म्हणुन घर संभाळतांना होणार्या तारेवरच्या कसरतीची सार्वधिक जाणीव महिलांनाच आहे. इंधन दरवाढीत गॅस आज जवळपास बाराशे रूपयांच्या जवळ पोहचला आहे.जीवनावश्यक वस्तुंचे ही दर गगनाला भिडले आहेत आणि आज अशा परिस्थितीत भाजप मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळाचा जल्लोष सामान्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतेय ही बाब अतिषय निंदनिय आहे.
दुसरीकडे त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या केंद्रातील सरकारने महागाईचा दर आटोक्यात ठेवत सामान्यांच्या हितासाठी काम केले. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीने आज महाराष्ट्रात महिलांचा यथोचित सन्मान होतो आहे. गावपातळीवरील संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
योगीता राजळे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी भाजप सरकार व पक्ष कसा महिला व सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणे ठरवितो हे महिलांमध्ये प्रकर्षाने मांडेल. सुत्रसंचालन करून आभार आरती निर्हाळी यांनी मानले.
Comments