अक्षय भालेराव याच्या हत्येचा निषेध । आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी
कर्जत । वीरभूमी - 14-Jun, 2023, 12:39 PM
भीमजयंती साजरी केल्यामुळे नांदेड येथील अक्षय भालेराव या बौध्द तरुणाची हत्या करण्यात आली. सदर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मंगळवारी आरपीआयकडून कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने आरपीआयचे पदाधिकारी निषेध मोर्च्यात सहभागी झाले होते. फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव या बौध्द तरुणाची निर्घुणपणे हत्या केली जाते. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून निषेधार्थ आहे. या निषेधार्थ मंगळवार, दि. 13 रोजी कर्जत आरपीआयकडून कर्जत शहर बंद ठेवण्यात आले होते.
यावेळी कर्जत आरपीआयकडून अक्काबाईनगर येथून पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, युवकचे जिल्हाध्यक्ष विशाल काकडे, नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र दामोदरे यांची भाषणे झाली. वरील घटनेचा कर्जत आरपीआय निषेध करीत असून दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थीक मदत करावी. तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देत पुर्नवसन करावे. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
परीक्षाविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा कर्जत पोलीस निरीक्षक अरुण पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अजय भैलुमे, हमजद शेख, संतोष आखाडे, सनी येलेकर, वसीम शेख, किरण भैलुमे, विजय साळवे, धीरज पवार, सागर भैलुमे, सुरज सातव, करण ओहोळ, बाळा आखाडे, दादा आखाडे, दादा कांबळे, सिद्धांत कदम, शाहरुख पठाण, प्रतीक सदाफुले आदी उपस्थित होते. व्यापारी बांधवानी सर्व व्यवहार बंद ठेवत कर्जत बंदला प्रतिसाद दिला होता.
wwaprm