चार हजाराची लाच घेतांना महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडले
शेवगाव । प्रतिनिधी - 15-Jun, 2023, 10:19 PM
तक्रारदार यांची दोन मुले व भाचा यांना सबजेलमधून सोडण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच तहसील कार्यालयात त्यांचेविरुद्ध चाप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतांना शेवगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले.
लाचखोर महसूल सहाय्यकाचे नाव संतोष सहदेव गर्जे (वय 38) असे आहे. ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत पथकाने आज गुरुवार दि. 15 रोजी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव येथील तक्रारदार यांचे दोन मुले व भाचा असे तिघांना सबजेलमधून सोडण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच तहसील कार्यालयात त्यांचेविरुद्ध चाप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक संतोष सहदेव गर्जे याने प्रत्येकी दोन हजार असे सहा हजार रुपयाची मागणी केली होती.
शेवगाव तहसील कार्यालयात पंचासमक्ष तडजोडीअंती 4 हजार रुपयाची लाच स्विकारतांना महसूल सहाय्यक संतोष गर्जे याला नाशिक येथील लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत पथकाचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोनि. मीरा आदमने यांच्यासह पोना. प्रकाश महाजन, पोना. प्रवीण महाजन, चालक हवा. संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
अनेक दिवसापासून शेवगाव तहसील कार्यालय लाचलुचपतच्या रडारवर होते. मात्र आज अखेर लाचलुचपत पथकाला यश आहे. सध्या शेवगाव तहसील कार्यालयात प्रभारी कार्यभार असल्याने कर्मचारी व अधिकारी यांची मनमानी सुरु असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
jCiSsZdWeTrcMag