एक जखमी । शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ
शेवगाव । वीरभूमी - 23-Jun, 2023, 09:10 AM
शेवगाव शहरातील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा यांच्या भरबाजारपेठेमधील घरावर दरोडा पडला आहे. हा दरोडा शुक्रवार दि. 23 रोजी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान पडला आहे.
यामध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय 55) व त्यांच्या भावजयी पुष्पा हरिकिशन बलदवा (वय 65) अशी मयताची नावे असून सुनीता गोपीकिशन बलदवा या जखमी झाल्या आहेत. शेवगाव येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा यांचे बाजारपेठेत घर आहे. शुक्रवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीकिशन बलदवा व त्यांची भावजयी पुष्पा बलदवा यांचा मृत्यू झाला आहे.
दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सुनीता बलदवा या जखमी झाल्या आहेत.
घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.
दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेने व्यापार्यामधून संताप व्यक्त होत आहे.
yPDuHgKfrNOz