पाथर्डी । वीरभूमी- 18-Jul, 2023, 10:09 PM
शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची रुपये 27 कोटी 50 लाख किंमतीची कामे पुरवणी अर्थसंकल्प जुलै-2023 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे मतदार संघातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. राज्यात सत्तांतर होऊन भाजपा शिवसेना शासनाच्या कालावधीत राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला.
या पुरवणी अर्थसंकल्पात पाथर्डी तालुक्यातील प्रजिमा 39 ते तोंडोळी सोनोशी येळी रस्ता मधील किमी 7/00 ते 11/00 मधील रस्ता करणे (रक्कम 300 लक्ष), तिसगाव ते अमरापूर किमी 0/00 ते 12/800 मधील रस्ता करणे (रक्कम 600 लक्ष), राममा 61 ते अकोला जांभळी खरवंडी किमी 3/00 ते 15/00 रस्ता करणे (रक्कम 600 लक्ष), या कामांचा समावेश आहे.
शेवगाव तालुक्यातील मुंगी ते कोळी वस्ती किमी 10/00 ते 13/00 मधील रस्ता व पुल करणे (रक्कम 200 लक्ष), शेवगाव पैठण रस्त्यावरील किमी 31/00 ते 36/00 मधील रस्ता करणे (रक्कम 150 लक्ष), तिसगाव शेवगाव पैठण रस्ता किमी 15/600 ते 21/300 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 250 लक्ष).
मिरी-माका ते शेवगाव रस्ता किमी 49/600 ते 53/300 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 200), खानापूर रावतळे राक्षी रस्ता किमी 1/800 ते 2/160 व किमी 4/300 ते 6/00 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 200), नेवासा शेवगाव गेवराई रस्त्यावरील किमी 196/400 ते 201/00 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 250), या रस्त्याचा कामांचा समावेश असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
मतदारसंघातील बहुतेक प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये तिसगाव-शेवगाव रस्ता, शेवगाव-पैठण रस्ता, शेवगाव-नेवासा रस्ता, शेवगाव-गेवराई रस्ता, पाथर्डीतील कोरडगाव-बोधेगाव रस्ता, पाथर्डी -चिंचपूर रस्त्यांवरील कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
मतदारसंघातील मुख्य रस्त्यांच्या कामासाठी 27 कोटी 50 लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी आभार मानले.
9ilbjt