शेवगाव । वीरभूमी - 19-Jul, 2023, 12:40 AM
शेवगाव तालुक्यातील लखमापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा पोपट गावंढे यांचा रोटेशन नुसार अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रीक्त झालेल्या सरपंचपदी सरस्वती देविदास हिंगे यांची निवड करण्यात आली आहे.
लखमापुरी ग्रामपंचायतीवर माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले व पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. लखमापुरीच्या सरपंच मनिषा पोपट गावंढे यांचा रोटेशन नुसार अडीच वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
सरपंच पदाच्या रीक्त जागेवर निवडीसाठी अध्यासी अधिकारी मंडल अधिकारी एस. पी. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सरपंच पदासाठी सरस्वती देविदास हिंगे यांच्या नावाची सुचना उपसरपंच गोविंद बप्पासाहेब गावंढे यांनी मांडली त्यास सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याने सरस्वती हिंगे यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नूतन सरपंच सरस्वती हिंगे यांच्यासह माजी सरपंच मनिषा पोपट गावंढे, उपसरपंच गोविंद बप्पासाहेब गावंढे, सदस्य अलका विष्णु थोरे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन मंडल अधिकारी एस. पी. गौडा यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी श्री. राठोड, ग्रामसेवक श्री. वाबळे भाऊसाहेब शिपाई कडुबाळ पवार यांनी सहाय्य केले.
निवडीनंतर नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ गावंढे, बप्पासाहेब गावंढे, अशोक गावंढे, संदीप हिंगे, विठ्ठल निर्मळ, दीपक सोनवणे, रामहरी गावंढे, सचिन निर्मळ, शरद जोशी, संभाजी काकडे, विष्णु थोरे, अशोक ढाकणे, राजू पातकळ, नानासाहेब गावंढे, भरत सरोदे, अंबादास सरोदे, विष्णु जर्हाड, राजू मंचरे, नवनाथ तांबे, रमेश काकडे, भाऊसाहेब अंबाडे.
सुधाकर सांगळे, गणेश अंबाडे, भाऊ अंबाडे, कैलास वाबळे, राम वाबळे, भरत गावंढे, दत्तात्रय तीळे, उत्तरेश्वर गिराम, राजेंद्र गावंढे, अशोक गावंढे, राम कवडे, जगन्नाथ गावंढे, अतीन गावंढे, संदीप काकडे, सोमनाथ गावंढे, योगेश गावंढे, ज्ञानेश्वर गावंढे, दिगांबर गावंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
UAaXIqTpFG