कर्जत । वीरभूमी- 21-Jul, 2023, 12:13 PM
कर्नाटक राज्यात झालेल्या जैन धर्म गुरूच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी कर्जत तालुक्यातील जैन बांधवांनी निषेध मोर्चा काढत आपला तीव्र संताप प्रशासनासमोर व्यक्त केला. यावेळी कर्जत, राशीन आणि मिरजगावसह तालुक्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नाटक राज्यात हिरेगुडी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे 6 जुलै रोजी जैन धर्मगुरू आचार्य कामकुमार नंदिजी महाराज यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. कर्नाटक सरकारने या हत्येचा योग्य तपास न करता यास वेगळीच कलाटनी देत समस्त संतांचा अपमान केला आहे. या घटनेतील मारेकरी अपराध्यांना कडक शासन व्हावे. तसेच या गुन्ह्याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सकल जैन समाज कर्जत तालुका यांच्यावतीने निवेदन देत करण्यात आली.
देशभरात गुरुवारी बंद पुकारून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. देशातील अल्पसंख्याक जैन समाजाच्या साधूसंतांना व जैन तीर्थाना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तहसीलदार गणेश जगदाळे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांच्याकडे करण्यात आली.
निवेदनावर भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आशिष बोरा, बीजेएसचे तालुकाध्यक्ष विजय खाटेर, श्री कलिकुंड पार्श्वनाथ ट्रस्टचे ट्रस्टी प्रसाद शहा, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व नगरसेवक अभय बोरा यांच्या सह्या असून यावेळी पोपटभाई देसाई, गौतमचंद बोथरा, अॅड. अशोक कोठारी, डॉ. प्रकाश भंडारी, स्वप्नील देसाई, रवींद्र कोठारी, सचिन बोरा, चेतन शहा, सचिन मुनोत, डॉ. उदय बलदोटा, किशोर बोथरा, पिंटूशेठ शर्मा, वृषभ अच्छा, प्रितेश मंडलेचा, सुरज जोशी, भूषण देसरडा, राजेंद्र बोरा, अतुल जैन, प्रवीण मुनोत, सुरेश बलदोटा, दीपक शहा, शुभम खाटेर, नगरसेवक सतीश पाटील, भाऊसाहेब तोरडमल आदी उपस्थित होते.
AdBkGXpnZcwUs