जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख । लिंपणगाव येथे शालेय साहित्य वाटप
श्रीगोंदा । वीरभूमी- 23-Jul, 2023, 01:06 PM
लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील जोशी वस्तीवरील आदिवासी व वंचित समाजातील शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांच्या प्रयत्नाने शनिवार दि.22 रोजी पुस्तके, शालेय साहित्य व गुलाब पुष्पाने स्वागत करून शाळेत प्रवेश देण्यात आला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख म्हणाले की, शिक्षण हा देशातील प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क असून सर्वांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविले पाहीजे. शिक्षणामुळे मानवी जीवन समृध्द होते. याबाबत शाळाबाह्य मुलांच्या पालकांना शाळेचे महत्व पटवून देत श्री. शेख म्हणाले की मुलांनी उच्च ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करावे. वाईट व्यसने, चुकीच्या कृती, गुन्हेगारी पासून दूर रहावे.
तालुका विधी सेवा समितीने गेल्या वर्षी 88 शाळाबाह्य मुला-मुलींना शैक्षणीक प्रवाहात आणण्याचे काम केले होते. शाळाबाह्य मुला-मुलींना शाळेत आणून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे कार्य मा. मुजीब शेख साहेब यांच्या पुढाकाराने होत आहे.
न्यायालयाला सुट्टी असतानाही मानवतावादी दृष्टीकोण व सामाजीक कार्याची आवड आणि समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्देशाने मा. मुजीब शेख यांनी शाळाबाहय मुलांना शैक्षणीक प्रवाहात आणण्याचा उपक्रम आयोजीत केला आहे.. श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षणापासून वंचीत असणार्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी केल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
याचबरोबर इंदिरा गांधी विदया निकेतन व श्री. शिवाजीराव नारायणराव नागवडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, वांगदरी येथील विदयार्थ्यांना बाल लैंगीक अत्याचारा पासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो) याबाबत मा. जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी मार्गदर्शन केले. गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अशोक रोडे, अॅड. विशाखा रोडे, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, लिंपणगाव केंद्र प्रमुख श्री. लंके, प्राचार्य खोमन सर, मुख्याध्यापक आबासाहेब जगताप, सरपंच शुभांगी सुर्यवंशी, उदयसिंह सुर्यवंशी उपस्थित होते.
Comments