तिसगाव । वीरभूमी - 14-Aug, 2023, 11:45 AM
केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य संग्रामात आपल्या जीवाची बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येक गावात स्मारक बांधून गौरव केला आहे. त्याचप्रमाणे लवकरच शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील आजी-माजी सैनिकांचा गौरव समारंभाचे आयोजन करण्याचा मानस आ. मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्यताील कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद जवान व स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मारकाचे अनावरण आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला, यावेळी आ. राजळे बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यस्थानी माजी सैनिक चंद्रकांत कवळे हे होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे, सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन संभाजी राजळे, उपसरपंच आशाताई तिजोरे, आर. वाय. म्हस्के, सोपानतात्या तुपे, डी. व्ही. म्हस्के, विक्रमराव राजळे, देविदास राजळे, ज्ञानदेव तुपे, शिवाजी खोजे, भाऊपाटील राजळे, सदाशिव तुपे आदी उपस्थित होते.
प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. यावेळी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत फेरी काढून कलश पुजन करण्यात येवून स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आ. मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सैनिकांचा गौरव करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने ‘हर घर तिरंगा झेंडा’ अभियानात सहभाग घेवून आपल्या घरावर संहिता पाळून तिरंगा ध्वज फडकावा. देशाच्या संरक्षणात सैनिकांचे मोठे योगदान आहे. कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीने माजी सैनिकांचा केलेला गौरव कौतुकास्पद आहे. लवकरच शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील माजी सैनिकांचा गौरव समारंभ केला जाईल.
यावेळी माजी सैनिक दादासाहेब शेळके, भाऊसाहेब राजळे, अशोक गायकवाड, ज्ञानदेव जगताप, विठ्ठल जगताप, सुहास राजळे, घोडके मेजर आदींचा योथोचित गौरव करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनिस, जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक, दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राध्यापक, ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजळे यांनी केले. सूत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी केले तर सदस्य अंकुश राजळे यांनी आभार मानले.
Comments