धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक । सुरक्षा रक्षकांकडून आंदोलकांना चोप
सोलापूर । वीरभूमी - 08-Sep, 2023, 11:25 AM
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना धनगर समाज बांधवही आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आज महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेले असता आंदोलकांनी आक्रमक होत थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर भंडारा उधाळला.
पालकमंत्री विखे यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलकांना चोप दिल्याची घटना घडली आहे. यामुळे मराठा समाजानंतर धनगर समाज बांधवही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी धनगर समाजाच्या आंदोलकांनी त्यांची वेळ मागत विश्रामगृहावर भेटण्याची विनंती केली. पोलिसांच्या मार्फतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलकांना भेटण्याची तयारी दाखवली.
यानंतर आंदोलक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात भेटीदरम्यान चर्चा सुरू असतानाच एका आंदोलकाने पालकमंत्री विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे जवळील सुरक्षा रक्षकांनी त्या आंदोलकाला चांगलाच चोप दिला.
विश्रामगृहावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भेटण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्यात आरक्षणावर चर्चा सुरु असतांनाच धनगर समाजाचे आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. ते निवेदन वाचत असतानाच शेखर बंगाळे याने पालकमंत्री राधाषृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. अचानक भंडारा उधळल्याने पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह सर्वच काहीकाळ गोंधळले.
भंडारा टाकल्यानंतर बंगाळे यास तेथे उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी चांगलाच चोप दिला.
यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा देत होते. यानंतर पालकमंत्री विखे यांनीच आंदोलकांना चोप न देता सोडविण्याचे निर्देश दिले. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
Comments