माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन
पाथर्डी । वीरभूमी - 27-Oct, 2023, 11:40 AM
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे आज शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान निधन झाले. मागील काही दिवसापासून ते आजारी होते.
संघर्षयोद्धा म्हणुन ते परिचित होते. बोधेगाव येथील माळरानावर त्यांनी केदारेश्वर सकारी साखर कारखान्याची उभारणी केली. हा कारखाना ऊसतोडणी कामागारांचा कारखाना म्हणुन परिचित आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा जन्म दि. 10 नोव्हेंबर 1937 रोजी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील शेतकरी कुटुंबात झाला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. उपचार सुरु असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. ते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांचे वडील, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणेे यांचे आजोबा होत.
pVjHofcdgXPmbE