पाथर्डी । वीरभूमी- 29-Oct, 2023, 03:42 PM
आरक्षणाच्या मुद्दावर ठिकठिकाणचा मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारी संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी गावागावात उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर गावागावात उपोषण सुरु करण्यात आले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी शहरातील नाईक पुतळा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे यांनी दुसर्यांदा अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणुन ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने उपोषण करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे.
यामुळे मराठा आरक्षणासाठीचा लढा निर्णायक वळणावर पोहोचला असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. तसेच मनोज जरांगे यांनी आंदोलनाची पढिील दिशा ठरवत आता गावागावात उपोषण करण्यात येत असल्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे.
या निर्णयानंतर आज रविवारी सकाळ पासून पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक पुतळा चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. याबाबत पाथर्डी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात जो पर्यंत राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
या निवेदनावर विष्णुपंत अकोलकर, बंडू बोरुडे, सुनील ओहोळ, महेश बोरुडे, बंडू पठाडे, जमीर आतार, अशोक भापकर, हरीभाऊ गोरे, दिलीप गायकवाड, अमोल शिंदे, विकास मोरे, दिपक मोरे, सचिन मोरे, संभाजी सबलस, आप्पा सबलस, बाबासाहेब मोरे, अमोल डांगे, अरुण वायकर, भागवत मोरे, दीपक मोरे, कल्याण बर्डे, शंकर बोरुडे, राजू गाडे, सतिष बुचकुल, सचिन वायकर, नावदेव लबडे.
विठ्ठल शेळके, संदीप पठाडे, जगदीश काळे, शिवनाथ मोरे, चंद्रकांत भापकर, प्रकाश धस, शशिकांत हरदास, प्रताप एकशिंगे, उद्धव माने, बबन सबलस, कृष्णा गाडे, प्रशांत शेळके, गणेश वायकर, संदीप काकडे, सचिन कोलते, कैलास खोर्डे, शेषराव जेधे, अनिल बोरुडे, नंदी सपकाळ, योगेश भोईटे, रामदास भापकर हरिभाऊ मोरे, उमेश खोर्डे, नितेश बोरुडे आदींच्या सह्या आहेत.
साखळी उपोषणाचा आज पहिलाच दिसव असून आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरु असणार आहे. तरी शासनाने तातडीने दखल घेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.
pitTgGPF