शेवगाव ः ग्रामपंचायत निवडणुकीत जनशक्तीची मुसंडी
सर्वात मोठा पक्ष म्हणुन घुले गटाचे वर्चस्व कायम । भाजपा दुसर्यास्थानी । मनसे, ढाकणे गट, बीआरएस प्रत्येकी एक
शेवगाव । वीरभूमी- 07-Nov, 2023, 03:46 PM
शेवगाव तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणुन घुले गटाने वर्चस्व कायम राखले आहे. तर दुसर्या स्थानी भाजपा कायम राहीली आहे. मात्र यावेळी काकडे यांच्या जनशक्ती आघाडीला चार ग्रामपंचायतीवर विजय मिळाल्याचा दावा केला आहे. तर घुले गटाने 17 जागेवर विजय मिळाल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे मनसे, बीआरएस व प्रताप ढाकणे यांच्या गटाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक आघाडी करत विजय मिळवल्याने आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांने दावा केला आहे.
तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान झाल्यानंतर सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. मतोमजणीमध्ये सामनगाव, वरुर, बालमटाकळी, ढोरसडे/अंत्रे, वडुले बुद्रुक आदी ग्रामपंचायती मध्ये सत्तांतर झाले आहे.
बालमटाकळी, सामानगाव, ढोरसडे/अंत्रे या ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडे असलेली सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणली आहे. तर राष्ट्रवादीच्या ताब्यातील वडुले बुद्रुक, वरुर ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकावला आहे. तसेच तालुक्यातील खरडगावमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या जनशक्ती आघाडीने मुसंडी मारुन राष्ट्रवादीच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली आहे.
बर्हाणपूर व शेकटे येथे सदस्य पदासाठी समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने कौल देण्यात आला. यामध्ये बर्हाणपूरमध्ये अशोक कुंडलिक वाणी तर शेकटेमध्ये गीताबाई चव्हाण या ईश्वर चिठ्ठीने विजयी झाल्या आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये गाव पातळीवर घुले गट, भाजप, जनशक्ती आघाडी समर्थकांनी युती करुन स्थानिक आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली होती. स्थानिक आघाडीने तब्बल चार ग्रामपंचायत काबीज केल्या आहेत. तर भाजपने सहा ग्रामपंचायत काबीज केल्या असल्याचा दावा केला आहे.
ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व उमेदवार (कंसात मते)- आव्हाने बु. ः पांडू रामदास वाघमारे (1305, सरपंच), सदस्य ः संतराम कारभारी दिंडे (274), प्रियांका अमोल कवडे (280), विनायक सुधाकर कळमकर (339), अश्विनी गणेश खैरे (311), संगीता प्रताप कोळगे (431), जयश्री नवनाथ तागड (479), रुपाली संजय नांगरे (476), सुधाकर रामभाऊ चोथे (302), अजमुद्दिन रहिमान पठाण (290), स्वाती अनिल साळकर (323, आशा शिवाजी रसाळ (294).
बर्हाणपुर ः वैशाली सुभाष वाणी (271, सरपंच), सदस्य ः नंदा सुनील खरात (124), विद्या ज्ञानेश्वर डोंगरे (130), अंकुश मोहन भालेराव (89), गीता शरद वाणी (81), विष्णू भगवान दिवटे (73), योगिता रोहिदास डोंगरे (66), अशोक कुंडलिक वाणी (ईश्वर चिठ्ठी). सामनगाव ः आदिनाथ रामनाथ कापरे (714, सरपंच), सदस्य ः आत्माराम संपत निकम (219), कृष्णा सुरेश सातपुते (213), विमल वसंत कांबळे (205), प्रमोद सुरेश कांबळे (277), लताबाई नंदू नजन (281), सुभद्रा बाबासाहेब काळे (252), सुदाम विनायक झाडे (213), संगीता रमेश नजन (170), शिला बाबासाहेब म्हस्के (191). लोळेगाव ः सुनिता भानुदास काळे (286, सरपंच). सदस्य ः ऐश्वर्या राजेंद्र शिनगारे (131), पूनम सुधीर काळे (129), वैशाली अनिल शिनगारे (125), अर्जुन विष्णू घनवट (106), सुशीला सोनाजी गालफाडे (102), अनशाबापु नाथा बुचकुल (132), चंद्रभागा काकासाहेब केदार (133).
वडुले बु. ः अलका भिमराज सागडे (1153, सरपंच), सदस्य ः गणेश नारायण बुचकुल (376), संगीता विष्णू शिंदे (371), सिंधू बाळासाहेब चोपडे (385), संजय अर्जुन पांडव (530), अजय मारुतराव डमाळे (489), सुनीता सुरेश केदार (522), जावेद बाबा शेख (428), मोनिका मंगेश पाखरे (390), विजयाबाई आप्पासाहेब हरदास (417). एरंडगाव भागवत ः अश्विनी गोकुळ भागवत (425, सरपंच) सदस्य ः संतोष रामनाथ गुजर (208), अर्चना संदीप भागवत (224), मीराबाई तुकाराम भागवत (208), स्वप्निल दत्तू गारदे (163), आदिनाथ रावसाहेब जाधव (135), सुनीता संदीप साळुंके (158), विजय भाऊसाहेब भागवत (बिनविरोध), वैष्णवी मुकुंद लोखंडे (170), रोहिणी काकासाहेब भागवत (156). लाखेफळ ः प्रीती करण गजभिव (283, सरपंच) सदस्य ः अशोक अंकुश आवारे (94), जयश्री बाबुराव बनकर (98), सुधीर गोरक्षनाथ सोनवणे (112), शोभा शिवदास आव्हाड (120), मिराबाई शिवाजी आवारे (115), शरद गोरक्षनाथ सोनवणे (84), पुष्पा आप्पासाहेब आवारे (103).
थाटे ः शितल परमेश्वर केदार (610, सरपंच) सदस्यः रामभाऊ शंकर ससाणे (250), मंगल अभिमन्यू केदार (276), शितल अशोक केदार (288), सुधीर निवृत्ती जायभाये (141), मनीषा सुनील जायभाये (141), दादासाहेब रावसाहेब सातपुते (214), स्वाती विठ्ठल केदार (215). भगूर ः कोमल वैभव पुरनाळे (566, सरपंच) सदस्य ः नागेश सुनील पुरनाळे (302), लताबाई दानियल गरुड (301), मनीषा नारायण जायभाये (313), सोमनाथ राजू साबळे (161), माया भाऊसाहेब गरुड (173), उद्धव शेषराव पुरनाळे (186), अनिसा चांदभाई पठाण (195). दिवटे ः मनीषा नितीन माळी (380, सरपंच) सदस्य ः किरण गोरख चव्हाण (121), सुनीता बाबासाहेब सांगळे (112), वनिता विजय चव्हाण (107), सहदेव दत्तात्रय जावळे (155), सोनल प्रकाश कणसे (149), दिगंबर शिवजी कणसे (137), नंदा ताराचंद वंजारी (128).
मुंगी ः ललिता राजेंद्र ढमढेरे (1756, सरपंच) सदस्य ः अरुण शंकर गायकवाड (370), अंजना दिगंबर बल्लाळ (402), विनोद बदाम घोरपडे (461), विठ्ठल सर्जेराव गव्हाणे (570), साखरबाई हरिभाऊ घोटाळे (561), मालोजी निशिकांत राजेभोसले (371), शिला राजेंद्र नरोटे (322), पल्लवी प्रदीप काटे (395), अशोक नंदू कुंढारे (460), यास्मिन कमाल शेख (323), सायरा म्हैतूलाल सय्यद (393), दामू लक्ष्मण घोरपडे (292), वंदना भाऊसाहेब घोटाळे (324), आशाबाई रमेश घोरपडे (275), विठ्ठल पांडुरंग साबळे (बिनविरोध) वरुर बु. ः सचिन राजेंद्र म्हस्के (1293, सरपंच) सदस्यः राकेश विजय गरुड (449), आबासाहेब बाबासाहेब बेडके (469), सोनाली श्रीकांत भुजबळ (335), दादासाहेब अंबादास वावरे (361), मंगल बाबासाहेब म्हस्के (402), मिरा महादेव तुजारे (388), बाळू शिवाजी धायतडक (247), भारती सोमनाथ तेलोरे (250), गोरक्षनाथ बबन वावरे (बिनविरोध), मंदाबाई रमेश म्हस्के (648), जयबु गफुर पठाण (466).
लाडजळगाव ः अंबादास बाबासाहेब ढाकणे (1745, सरपंच) सदस्यः सचिन बंडू पाटील (496), अर्चना वसंत वीर (565), दादासाहेब मोहन तहकिक (325), कांताबाई बबन राठोड (335), कल्याण बाळासाहेब जाधव (337), काकासाहेब प्रल्हाद तहकिक (278), आकाश आप्पासाहेब काजळे (344), कृष्णाबाई विठ्ठल कदम (282), शितल विशाल पाटील (368), सरला सुरेश घुमरे (292), भरत शिवाजी गव्हाणे (285), मीनाबाई मोहन शिंदे (286), आशाबाई शेषराव वंजारी (246) गोळेगाव ः मुक्ता संजय आंधळे (473, सरपंच) सदस्य ः संजय सोना पवार (155), भारत सूर्यभान आंधळे (156), सिमाबाई भुजंग आंधळे (170), नवनाथ लक्ष्मण रास न कर (177), लीलाबाई राधुबा बर्डे (174), मुक्ताबाई महादेव सानप (153), किसन नाथा आंधळे (184), मंजुश्री शरद फुंदे (171), प्रणिता शरद बर्डे (173). मडके ः लक्ष्मण रमेश भवार (483, सरपंच) सदस्य ः बब्रुवाहन भानुदास वडघणे (150), भाग्यश्री अरुण भिसे (149), सुशीला सीताराम वडघने (148), राहुल दिलीप झारगड (116), रोहिणी ज्ञानेश्वर वडघणे (117), अशोक श्रीधर उभेदळ (179), मंगल राजेंद्र वडघणे (149).
खडके ः शिवानी नारायण पाखरे (343, सरपंच) सदस्य ः रामदास अशोक शिंदे (181), आकांशा विठ्ठल पाखरे (172), शीतल कृष्णा पाखरे (209), सुखदेव हरिभाऊ पाखरे (74), पार्वती लक्ष्मण पाखरे (79), प्रवीण प्रभाकर कर्हे (106), मनीषा संजय गरुड (104). बालमटाकळी ः राम भीमराव बामदळे (2032, सरपंच) सदस्य ः विक्रम सुधाकर बारवकर (482), आशा दिलीप भोंगळे (559), अरूणाबाई सर्जेराव घोरपडे (544), कैलास आबासाहेब पौळ (493), विठ्ठल मोहन देशमुख (443), मेहमूददाबी युसुफ शेख (511), गणेश रायभान शिंदे (447), सोनाली शाम राजपुरे (470), रेखा सोमनाथ धोंगडे (326), संगीता दुर्योधन काळे (362), ज्ञानेश्वर नामदेव वैद्य (306), सुवर्णा महेश घरगणे (316), बिस्मिल्ला मकबूल शेख (302).
बोधेगाव ः सरला महादेव घोरतळे (2237, सरपंच) सदस्य ः अंकुश गणपत घोरतळे (551), सुमन कचरू गर्जे (673), ज्योती परमेश्वर झांबरे (601), महेश राजेंद्र घोरतळे (459), सुरेखा किरण दसपुते (454), प्रमिला दत्तात्रय घोरतळे (450), राम मोहन अंधारे (441), सुरेखा सुनील गायके (365), राहुल भरत गोरे (324), संदीप कडेराम बानाईत (291), शायदा युनूस सय्यद (292), उस्मान चांद कुरेशी (373), सुलताना समीर बागवान (443), अनुसया लक्ष्मण मासाळकर (422), संग्राम नितीन काकडे (584), मयूर अनिल हुंडेकरी (516), निर्मला सदानंद गायकवाड (503) कर्हेटाकळी ः सुनिता संजू गटकळ (499, सरपंच) सदस्य ः ओमप्रकाश रामचंद्र ससाणे, कविता संतोष लेंडाळ, सरताज जाकिर शेख, मोईन यासीन सय्यद, सुनीता भीमा दाभाडे, शैला विष्णू राठोड (सर्व बिनविरोध), अमोल रामनाथ ससाणे (292), दगडू धनाजी गटकळ (273), संगीता बाप्पुसाहेब गायके (242) हिंगणगाव ने ः सतीश बन्सी पवार (511, सरपंच) सदस्य ः अमोल बन्सी आहेर (175), शिवकन्या लक्ष्मण वाबळे (181), वैशाली अनिल पवार (174), किरण विजय साठे (149), योगिता विनोद पवार (143), संदीप साहेबराव शिंदे (209), विजया अण्णा बामदळे (212)
ढोरसडे/अंत्रे ः ज्ञानदेव मुरलीधर निमसे (355, सरपंच) सदस्य ः किसन भाऊसाहेब तूजारे (365), चंद्रकांत आप्पासाहेब ठोंबळ (192), शुभांगी दीपक कणके (200), कृष्णा बाळासाहेब गाढे (225), सोनाली किशोर वाघमारे (227), छाया पांडुरंग माळवदे (204), किशोर गोकुळ निकम (200), अश्विनी रामेश्वर खंबरे (171), सुरेखा रामकिसन तासतोडे (218) शहरटाकळी ः उषाबाई बबन मडके (1068, सरपंच) सदस्यः राजेंद्र दामू चव्हाण (355), सुलभा अण्णासाहेब शिंदे (471), शांता वसंत कोल्हे (486), संभाजी शिवाजी गवळी (406), वैशाली श्रीधर कोल्हे (374), अनिता प्रकाश खंडागळे (389), गिरम रामाप्पा राचाप्पा (340), वर्षा सचिन पंडित (349), मथुराबाई सीताराम बोरुडे (185), राजेंद्र भाऊसाहेब काकडे (212), सविता राजेंद्र खंडागळे (213)
देवटाकळी ः ज्ञानदेव त्रिंबक खरड (907, सरपंच) सदस्य ः सुरेश विश्वनाथ वाघमारे (387), योगेश निवृत्ती सावंत (393), उज्ज्वला अशोक मेरड (434), अमोल संजय खरड (363), सविता नानासाहेब खरड (358), सविता आदिनाथ खरड (312), भाऊसाहेब भानुदास मुके (336), शितल सचिन मेरड (351), सुशीला संदीप ओंबळे (341) खरडगाव ः भगवान एकनाथ डावरे (878, सरपंच) सदस्य ः संतोष अंकुश बोडखे (236), जनाबाई कनिफनाथ तेलुरे (245), अमोल तबाजी बोडखे (312), प्रवीण पांडुरंग गायकवाड (278), मंदा दत्तात्रय सरसे (219), नवनाथ राम झांजे (200), सुनीता सुरेंद्र लबडे (235), शोभा निवृत्ती घोरपडे (182), भानुदास लक्ष्मण नन्नवरे (220), सविता आदिनाथ बोडखे (238), लता वसंत लबडे (228) वडुले खुर्द ः मीराबाई भाऊसाहेब आव्हाड (1084, सरपंच) सदस्य ः दादासाहेब भानुदास गाडेकर (273), ललिता महादेव आव्हाड (272), रेणुका विष्णू आव्हाड (268), रावसाहेब वसंत पाखरे (410), तात्याभाऊ पाटीलबा तुतारे (440), रंजना सोपान रनमले (456), रामदास मारुती पांढरे (414), अर्चना अजिनाथ आव्हाड (394), त्रिवेणी कानिफनाथ आव्हाड (394)
एरंडगाव समसुद ः प्रमिला संतोष धस (789, सरपंच) सदस्य ः आप्पासाहेब दगडू कताडे (275), प्रियांका प्रकाश गजभिव (256), वैशाली मुकुंद धस (284), नंदुलाल लक्ष्मण गरोटे (261), अनिता मोजेस गजभिव (243), लता फ्रान्सिस गजभिव (237), प्रमोद विजय गजभिव (285), शंकर रंगनाथ कुरुंद (296), सविता किसन क्षीरसागर (260) शेकटे खुर्द ः लक्ष्मण खेमा राठोड (307, सरपंच) सदस्य ः कविता शंकर राठोड, राजश्री गणेश मारकंडे, बाळू काशिनाथ मारकंडे, लता पेत्रस सोनवणे (सर्व बिनविरोध), पूजा रामेश्वर आंधळे (118), शेषराव फाकिरचंद राठोड (129), गीताबाई विश्वनाथ चव्हाण (114, ईश्वर चिठ्ठी) रावतळे/कुरुडगाव ः (पोटनिवडणूक) जालिंदर बाळासाहेब काळे (216, सदस्य)
VjnrGpaYolKQ