अकोले ः ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का
बहुतांश ग्रामपंचायतींचे संमिश्र निकाल । राजकीय पक्षाकडून दावे प्रतिदावे
विद्याचंद्र सातपुते । वीरभूमी - 07-Nov, 2023, 04:06 PM
अकोले ः अकोले तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ग्रामपंचायतींचे निकाल धक्कादायक लागले असून अनेक ग्रामपंचायतीमधील सत्तारूढ गटाची सत्ता संपुष्टात आणत नवोदितांनी ‘हम भी किसीं से कम नही’ हे दाखवून दिले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भाजपा, राष्ट्रवादी (अजितदादा गट), शरद पवार गट, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांनी दावा केला आहे. काही सरपंचपदाच्या विजयी उमेदवारांनी आपण अपक्ष असल्याचे विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अकोले तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. तर 21 ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान होऊन सोमवारी सकाळी तहसिल कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. निकालाचे वेळी अकोले पोलिस निरिक्षक विजय करे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपाकडून 14 ग्रामपंचायत, राष्ट्रवादी काँग्रेस (आ. लहामटे गट) - 10 व बिनविरोध मधील 5 अश्या एकुण 15 ग्रामपंचायत, राष्ट्रवादी (शरद पवार) सुनिता भांगरे -13, शिवसेना शिंदे गट (जिल्हा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे)-7 ग्रामपंचायतीत विजयाचा दावा केला आहे.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत समजल्या जाणार्या सुगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अकोले एज्युकेशनचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, आरपीआयचे राज्याचे नेते विजयराव वाकचौरे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक प्रकाश देशमुख, माजी सरपंच सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अनुप्रिता विराज शिंदे यांची लोकनियुक्त सरपंचपदी वर्णी लागली आहे. विरोधी विखे समर्थक विकास वाकचौरे यांच्या मंडळाने 9 पैकी पाच जागांवर विजय संपादन केला आहे.
गर्दणी गावच्या निवडणुकीत सत्ताधारी व अगस्ती कारखान्याचे संचालक, गावावर आत्तापर्यंत एकहाती सत्ता असणार्या परबतराव नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या स्नुषा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. आजच्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने काही ग्रामपंचायतीत विजय संपादन करत विजयाचे खाते उघडले आहे.
साम्रद ग्रामपंचायत निकालासंदर्भात उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने या ग्रामपंचायतची फेरमतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले गावनिहाय सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणे (कंसात त्यांन मिळालेली मते)- सुगाव बुद्रुक ः डॉ. अनुप्रिता शिंदे (770, सरपंच). सदस्य ः दिलीप दत्तात्रय देशमुख (285), नंदा भास्कर शिंदे (404), रोहिणी चंद्रकांत भांगरे (420), महेश माणिक देशमुख (240), लताबाई गंगाराम माळी (231), शोभा सोमनाथ उगले (234), प्रशांत संपत देशमुख (214), तान्हाजी दिलीप देशमुख (241), क्रांती विनेष देशमुख (258).
रेडे ः प्रशांत विठ्ठल बंदावणे (395, सरपंच), सदस्य ः संतोष हरिभाऊ गायकवाड (135), माधुरी अशोक पांडे (125), चैताली नितिन भुजबळ (127), महेश अच्युत भवारी (बिनविरोध), शिल्पा संतोष बंदावणे (76), प्रवीण सखाराम चौधरी (115), वैशाली संदीप पारासुर (106). गर्दणी ः साधना अनिल अभंग (976, सरपंच), सदस्य ः अण्णासाहेब सुखदेव पाबळे (300), लीला नारायण कोरडे (330), पल्लवी सुरेश कोतवाल (बिनविरोध), दत्तु सखाराम मेंगाळ (226), प्रियंका नवनाथ खोडके (236), मिना सोमनाथ जेडगुले (209), रावसाहेब देवराम आगिवले (397), नारायण यशवंत जगधणे (375), आशा शिवाजी उंबरे (368).
कोंभाळणे ः नारायण महादु बांबळे (484, सरपंच), सदस्य ः गायन मुरलीधर साबळे (251), सुनिता रविंद्र पोपेरे (बिनविरोध), वैशाली विजय दराडे (197), सखाराम सोमा पोपेरे (213), अक्साबाई रामदास पिचड (217), अनिता भास्कर सदगीर (170), खंडु तुकाराम डहाळे (248), भारत तुकाराम सदगीर (266), लक्ष्मी महादु बांबळे (251). पैठण ः रावजी दादु गंभिरे (343, सरपंच), सदस्य ः कैलास लक्ष्मण संगारे (168), निलेश चंद्रभान तळेकर, सविता राजेश तळपे, अनिल रावसाहेब बुळे, सुनिता अंकुश भोईर, सोनाली मच्छिंद्र तळेकर, योगिता अमोल भांगरे, देविदास गणपत भाईक, अनुराधा काशिनाथ तळेकर (सर्व बिनविरोध).
जाहगिरदारवाडी ः पंढरीनाथ गणपत खाडे (346, सरपंच), सदस्य ः सुनिल विठ्ठल खाडे, इंदुबाई काशिनाथ घाणे, रूक्मिणी नामदेव करटुले, संतोषी संतोष घोडे, सुनिता यशवंत खाडे (सर्व बिनविरोध), सोपान गोविंद दराणे (111), मच्छिंद्र यशवंत खाडे (167). बारी ः वैशाली दामु खाडे (260, सरपंच), सदस्य ः त्रिंबक कुंडलिक खाडे (118), हिराबाई मारुती भारमल (बिनविरोध), भाउ महादु खाडे (114), रोहिणी मच्छिंद्र खाडे (68), गणेश किसन खाडे (85). साम्रद ः एकनाथ भाऊ बांडे (217, सरपंच), सदस्य ः काळु सोमा बांडे (126), कल्पना सुभाष खाडे (बिनविरोध), सुलोचना नवनाथ बांडे (बिनविरोध), नामदेव विलास बांडे (74), मंजुळा मच्छिंद्र मुठे (बिनविरोध), गोरख भाऊ बांडे (63), हिराबाई लक्ष्मण बांडे (61).
रतनवाडी ः धनश्री विठ्ठल तातळे (सरपंच), सदस्य ः शिवाजी बुधा झडे, भरत चिंधु झडे, सारीका संतोष भांडकोळी (बिनविरोध), अनिता लक्ष्मण धोंगडे (बिनविरोध), घनश्याम निवृत्ती झडे (बिनविरोध), सनाबाई बुधा झडे (बिनविरोध), मिनाबाई मारुती झडे (बिनविरोध). मुतखेल ः दीपाली सागर रोंगटे (सरपंच), सदस्य ः महेश नंदु इदे, रूक्मिणी युवराज इदे (बिनविरोध), आशा शरद इदे (बिनविरोध), रामचंद्र नारायण इदे, सुरेखा यादव इदे (बिनविरोध), कैलास अर्जुन इदे (बिनविरोध), लीलाबाई सोनु इदे (बिनविरोध).
पाचनई ः भास्कर नाथु बादड (292, सरपंच), सदस्य ः पोपट विठ्ठल गावंडे (130), किरण सुभाष भारमल (67), उषाबाई संदिप भारमल (बिनविरोध), दत्तु बाळु भारमल (86), मनिषा पंढरीनाथ बादड (बिनविरोध) व अनुसूचित जमाती स्त्रीच्या दोन जागा रिक्त. पेंडशेत ः सोमनाथ पदमिरे (273, सरपंच), बिनविरोध सदस्य ः मारुती रामा मुठे, सुरेखा दत्तू पदमेरे, हिराबाई पंढरीनाथ खोले, दत्तू गोविंद पदमेरे, केशव हिरामण वळे, योगिता सागर खाडे व एक जागा रिक्त.
वांजुळशेत ः पद्मिनी मच्छिंद्र भांडकोळी (436, सरपंच), सदस्य ः भाऊ किसन कोंडार (270), रत्ना सचिन कोंडार (बिनविरोध), मंजुळाबाई वाळु कोंडार (बिनविरोध), किसन लक्ष्मण लोहकरे (बिनविरोध), वैशाली मधुकर सदगीर, (बिनविरोध), तुकाराम मधु कोंडार (बिनविरोध), चंद्रभान विठ्ठल वाळेकर (बिनविरोध), सुनंदा सोमनाथ वाळेकर (बिनविरोध), अनुसूचीत जमाती स्त्री एक जागा रिक्त.
पिंपळगाव नाकविंदा ः लक्ष्मण किसन सोंगाळ (599, सरपंच), सदस्य ः शिवराम सखाराम मेंगाळ (177), सुमन सदु आढळ (बिनविरोध), सुरेखा रवीद्र लगड (197), चिमन नाथु मेंगाळ (216), रखमाबाई नाथु मेंगाळ (बिनविरोध), अलका गोरक्ष आभाळे (229), नवनाथ नारायण जाधव (350), मारुती रामभाऊ काळे (361), कमल नामदेव सोंगाळ (बिनविरोध). एकदरे ः योगेश भागा भांगरे (228, सरपंच), सदस्य ः नानासाहेब मारुती भांगरे(बिनविरोध), लीला नानासाहेब भांगरे (बिनविरोध), अनिल अंकुश पोटे (बिनविरोध), मंदा रामदास भांगरे (बिनविरोध) व 3 जागा रिक्त
तिरडे ः विठ्ठल पुनाजी गोडे (288, सरपंच), सदस्य ः पुंडलिक बाळु गोडे (बिनविरोध), ज्योती सोमनाथ गोडे (बिनविरोध), शकुंतला बबन जाधव (बिनविरोध), नामदेव गोविंदा जाधव (239), लक्ष्मी शशिकांत गोडे (बिनविरोध), नवनाथ निवृत्ती गोडे (171), उत्तम म्हसू गोडे (बिनविरोध), सुनिता काळु गोडे (बिनविरोध), मंदा उमेश जाधव (बिनविरोध). पाचपट्टावाडी ः भगवंता लहु खोकले (403, सरपंच), सदस्य ः बाळु खंडु खोकले (बिनविरोध), विमल रामदास खोकले (बिनविरोध), सुनिता काशिनाथ खोकले (बिनविरोध), अरुण विठ्ठल राक्षे (165), नंदा नामदेव खोकले (बिनविरोध), प्रवीण दुंदा जाधव (बिनविरोध), मनिषा दादाजी खोकले (143).
घोटी ः मनोहर नवनाथ घोडे (113, सरपंच), सदस्य ः निंबा सोमा घोडे (61), मनोहर नवनाथ घोडे (बिनविरोध), रोहिदास अनाजी घोडे (98) व 04 जागा रिक्त. पिंपळदरावाडी ः सचिन रामभाऊ भांगरे (251, सरपंच), सदस्य ः साहेबराव भगवंता भांगरे (101), मिराबाई लालु भांगरे (बिनविरोध), रोहिणी गुलाब भांगरे (बिनविरोध), जगन सखाराम भांगरे (96), म्हाळसाबाई रामदास भांगरे(बिनविरोध), रामा बाळु भांगरे (102), मिराबाई लालु भांगरे (बिनविरोध).
शिसवद ः अनंता देवराम पोरे (242, सरपंच), सदस्य ः जालिंदर बाळु भारमल (101), पार्वता साहेबराव पोरे (बिनविरोध), वनिता पुनाजी पोरे (बिनविरोध), संपत भिमा पोरे (87), वंदना राजु दिघे (बिनविरोध), भागवत पुनाजी चिखले (129) व अनुसूचीत जमाती स्त्रीच्या वार्डातील जागा रिक्त राहिली. अंबित ः रोहीणी लक्ष्मण गिर्हे (356, सरपंच), सदस्य ः रामचंद्र मनोहर मधे (बिनविरोध), सुमन काळु डाके (बिनविरोध), विठ्ठल ठका धिंदळे (बिनविरोध), सुनिता सुरेश धिंदळे (बिनविरोध), साहेबराव सखाराम भारमल (बिनविरोध), शांताबाई राजु धिंदळे (बिनविरोध), संगिता कुंडलिक धिंदळे (बिनविरोध).
राजकीय दृष्टया जागृत असणार्या खानापूर-आगार, पेढेवाडी, कोकणवाडी, कौठवाडी, देवगाव, व आंबेवंगन या ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदाच्या सर्वच्या सर्व जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. आज अधिकृत त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सरपंच पदाचे बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे-खानापूर-आगार-भरत पंढरीनाथ नवले, पेढेवाडी- भागवत गंगाराम गातवे, कोकणवाडी ः सुलोचना संतु जाधव, कौठवाडी-लता रामचंद्र धादवड, देवगाव-तुळसाबाई गुरुनाथ भांगरे व आंबेवंगन- उषा प्रकाश धांडे, तर
ग्रामपंचायत सदस्य व गाव पुढीलप्रमाणे- खानापूर-आगार-अनिल भीमा मेंगाळ,अनिता सुरेश खोडके, संगीता निवृत्ती आरोटे, नानासाहेब किसन दातखिळे,रोहिणी विष्णू कातोरे, भरत गंगाराम मेंगाळ,संगीता शिवाजी भुजबळ, आंबेवंगन-पंढरीनाथ हरी धराडे, सुरेखा सोपान धांडे, संजय दुंदा धांडे, युवराज खंडू धांडे, अनिता रामदास धांडे, कौठवाडी-विष्णू वाळू भांगरे, योगिता राजेंद्र धादवड, लता मानकु भोईर, महेश ज्ञानेश्वर भांगरे, सोनाली शिवाजी भांगरे, ज्ञानेश्वर शंकर धादवड, मीरा सुरेश भांगरे,
पेढेवाडी-सुनीता सोमनाथ गोडे, तुकाराम मुरलीधर कुलाळ, योगिता सोमनाथ गोडे, जासुंदा दत्तात्रय बेंडकुळे, शंकर बुधा बेंडकोळी, नामदेव देवराम तळपाडे, नवसाबाई दामू कुलाळ, देवगाव-तुळसाबाई गुरुनाथ भांगरे, अरुण मिनानाथ भांगरे, पांडुरंग केरू भांगरे, दत्तात्रय भिवा भांगरे.
कोकणवाडी ः सुलोचना संतु जाधव, चित्राबाई चंद्रकांत जाधव, पोपट ठका बेंडकोळी, द्रौपदा भगवंता जाधव, जगन किसन लोहरे, महेंद्र एकनाथ जाधव, सखुबाई नामदेव जाधव. निकाल जसे जसे जाहीर करण्यात आले तसतसे विजयी सरपंच व सदस्य यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
भाजपच्या कार्यालयात माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख आदींनी विजयी सरपंच व सदस्य यांचे सत्कार करण्यात आले.
sNzSCoiykQWHt