पाथर्डी ः ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व
15 ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायतीवर भाजपाचा विजय; 2 आ. तनपुरे (राष्ट्रवादी), 1 शिवसेना उबाठा तर 1 अपक्ष
अनिल खाटेर । वीरभूमी- 07-Nov, 2023, 04:16 PM
पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज घोषीत झाले असुन थेट जनतेतुन सरपंच निवडीत आमदार मोनिका राजळे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 15 पैकी 11 ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (शरद पवार गट) 2 ग्रामपंचायतीवर तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर एक ठिकाणी अपक्ष यांना प्रत्येकी 1 ग्रामपंचायती मध्ये विजय मिळविण्यात यश आले आहे. तर राष्ट्रवादीच्या अॅड. ढाकणे गटाला एकही ग्रामपंचायतीत सत्ता मिळवता आली नाही.
डांगेवाडी ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाली होती. तर जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे चारुदत्त वाघ विजयी झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अमोल वाघ यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत. बहुमत अमोल वाघ यांच्याकडे आहे. तसेच हत्राळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.संगिता केदार विजयी झाल्या आहेत. मात्र बहुमत विरोधी गटाकडे गेले आहे.
तहसिल कार्यालयात मतमोजणी सोमवारी पार पडली. तहसीलदार शाम वाडकर व निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते. विजयानंतर विजयी उमेदवारांनी समर्थकांसह गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांचे आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आमदार प्राजक्त तनपुरे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर आदींनी अभिनंदन केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सरपंच व सदस्य पुढील प्रमाणे डांगेवाडी ः (सर्व बिनविरोध)सोमनाथ अकोलकर (सरपंच), सदस्य ः दत्तात्रय अकोलकर, भाऊसाहेब चितळे, लताबाई सकुंडे, मंदा डांगे, संध्या अकोलकर, जया खवले, गणेश सपकाळ. साकेगाव ः अलका चंद्रकांत सातपुते (सरपंच), सदस्य ः सतिष सातपुते, निर्मला सातपुते, आशाबाई सातपुते, शाहु बळीद, छाया वाघ, रुकसाना शेख, अजय सातपुते, सुवर्णा तांबे, नवनाथ एकशिंगे, संदीप चव्हाण, हिरा सातपुते.
पाडळी ः अशोक गर्जे (सरपंच). सदस्य ः दिलीप कचरे, ज्ञानेश्वर गर्जे, संगिता कांबळे, गणेश कचरे, सुमन पाचरणे, उज्वला तुपे, सुनिल सांळुके, सुखमिनी बांगर, मिरा कचरे. सैदापुर ः संगिता विष्णु केदार (सरपंच) सदस्य ः परमेश्वर टकले, पुजा टकले, कविता साळवे, नितीन काकडे, इंदुबाई पटारे, कचरु पटारे, राधाबाई टकले. ढवळेवाडी ः सीमा बाबासाहेब चितळे (सरपंच), सदस्य ः सचिन पवार, संगिता दुसंग, मंदाबाई चितळे, दुराजी माने, वैशाली ढवळे, मयुर चितळे, विमल चितळे.
जवखेडे ः चारुदत्त वाघ (सरपंच) सदस्य ः गणेश कासार, शुभांगी कासार, अमोल वाघ, सुनिता वाघ, शांता आंधळे, इरफान पठाण, कौसाबाई जाधव, वर्षा गवळी, स्वप्नील वाघमारे, विद्या आंधळे. करंजी ः नसीमा रफिक शेख (सरपंच) सदस्य ः नवनाथ आरोळे, रुपाली अकोलकर, अलका अकोलकर, सुनिल अकोलकर, सुरेखा आहेर, अर्चना गुगळे, गणेश अकोलकर, विमल अकोलकर, मारुती क्षेत्रे, सविता अकोलकर, आंबादास नजन, अर्जुन अकोलकर, मनिषा भिटे. डोंगरवाडी ः उद्धव गीते (सरपंच) सदस्य ः रामकिसन गिते, मालिका गिते, गयाबाई आव्हाड, आदिनाथ गिते, शारदा गिते, अमोल गिते, सिता गिते.
हत्राळ ः राधा शिवणकर (सरपंच) सदस्य ः संभाजी केदार, राणी कराड, मिरा केदार, बापु केदार, संगिता दराडे, रामराव केदार, मुक्ता केदार. चिचोंडी ः श्रीकांत आटकर (सरपंच), सदस्या ः अनिता फुलमाळी, इम्रान शेख, अंबिका दानवे, संदीप गरुड, आशाबाई जर्हाड, सपना तुपे, सुदर्शन गायकवाड, वंदना भिंगारदिवे, व्दारकाबाई आव्हाड. धारवाडी ः तारामती भीमराज सोनवणे (सरपंच) सदस्य ः बाबासाहेब गवळी, योगिता घुगे, अनिता सोनवणे, रामेश्वर काळापहाड, शितल शिरसाट, भाऊसाहेब गोरे, स्वाती गोरे.
डमाळवाडी ः कुसुम अंबादास डमाळे (सरपंच) सदस्य ः गौतम डमाळे, स्वाती डमाळे, किरण शिरसाट, श्रीकृष्ण डमाळे, पदम डमाळे, अंकुश सानप, इंदुबाई शिरसाट. रेणूकाईवाडी ः संदीप महादेव देशमुख (सरपंच) सदस्य ः प्रदीप निंबाळकर, राणी निंबाळकर, राणी म्हस्के, अजय घोरपडे, जनाबाई कुचे, अरुण झाडे, अलका म्हस्के. दगडवाडी ः उषा सुभाष शिंदे (सरपंच) सदस्य ः अजिंक्य शिंदे, ललिता आंधळे, शोभा काळे, मारुती शिंदे, रतन गायकवाड, भाऊसाहेब शिंदे, साधना शिंदे. गितेवाडी ः कमल रामदास गिते (सरपंच) सदस्य ः रामेश्वर गिते, प्रियांका पोटे, कमल गिते, प्रकाश पोटे, यमुना पोटे, अमोल गिते, चंद्रभागा पोटे.
SvkKorCgm