कर्जत ः ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा!
6 पैकी 4 ग्रामपंचायतीवर भाजपाचा दावा । अजितदादा आणि आ. रोहित पवार यांच्याकडे प्रत्येकी एक
डॉ. अफरोज पठाण । वीरभूमी 07-Nov, 2023, 04:22 PM
कर्जत - कर्जत तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणुकीत 4 ग्रामपंचायतीवर भाजपाचाच वरचष्मा राहिला असून आमदार राम शिंदेच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास दाखवला आहे. तर औटेवाडी ग्रामपंचायत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे आणि गणेशवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे समर्थकांनी सांगितले.
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपाचे आमदार राम शिंदेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना धोबीपछाड दिली. आजचा निकाल आमदार रोहित पवार यांच्या आगामी राजकारणासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्ताधारी गटाला फटका बसला आहे. राजकीयदृष्टया महत्व असलेल्या कुंभेफळ ग्रामपंचायतीवर धुमाळ गटाने तर खेडमध्ये मोरे यांनी सरपंच पदासह सत्ता काबीज केली आहे.
मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. कर्जत तालुक्यातील कुंभेफळ, खेड, करमणवाडी, वायसेवाडी, गणेशवाडी आणि औटेवाडी ग्रामपंचायतीसाठी रविवारी सरासरी 91 टक्के मतदान झाले होते. सोमवारी, सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणीस प्रारंभ झाला. सहा टेबलवर अवघ्या चार फेर्यामध्ये निकाल घोषित करण्यात आला.
यामध्ये 6 ग्रामपंचायतीपैकी कुंभेफळ, खेड, वायसेवाडी आणि करमणवाडी या 4 ग्रामपंचायतीवर भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दावा केला आहे. तर औटेवाडी ग्रामपंचायतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने बिनविरोध करण्यात यश मिळवले होते. तर गणेशवाडी ग्रामपंचायत आमदार रोहित पवार गटाकडे राखण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीच्या सुनील शेलार यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी निवडून आलेल्या सरपंच पदावरील व्यक्तीने आपला पक्ष सांगितल्यावरच विरोधकांनी दावा करावा, अशी सावध प्रतिक्रिया दिली. निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांनी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांचे वाजत-गाजत मिरवणुकीने दर्शन घेतले.
कुंभेफळ ः प्रियंका संतोष धुमाळ (1045, सरपंच) सदस्य : जहीर इंनुस शेख (274), आश्विनी भाऊसाहेब धोदाड (324), मिनल रणजीत धोदाड (266), अनिल वसंत कवडे (372), श्रीराम दशरथ दळवी (364), कृष्णाबाई हनुमंत नेटके (322), ऋषीकेश बाप्पासाहेब धांडे (421), प्रेमा आण्णा धांडे (443), दिपाली अनिल सावंत (440). खेड ः अमित विलासराव मोरे (1336, सरपंच) सदस्य : चंद्रकांत मोरे (375), शारदा दत्तू खंडागळे (402), उज्ज्वला चौरंग मोरे (388), हनुमंत रणवरे (273), जयश्री सत्यवान शेटे (262), उज्ज्वला महादेव वाघमारे (287), मोहन शेटे (337), स्वाती अनिल काकडे (336), उमाकांत नलगे (361), सुनील गायकवाड (336), मीना अनिल आगवन (332).
गणेशवाडी ः गणेश दादासाहेब पाडुळे (1329, सरपंच) सदस्य : गणपत कायगुडे (411), सुनीता राजेंद्र खताळ (460), तेजल संतोष दातीर (405), शंकर ठोंबरे (382), सुजाता संतोष कायगुडे (408), सुरेखा सुनील मदने (362), दत्तात्रय कारंडे (391), विकी बारटक्के (431), विमल संजय दातीर (385). वायसेवाडी ः मनेश पोपट हिरनवळे (575, सरपंच). सदस्य : महादेव कायगुडे (239), मनीषा दत्तात्रय पवळ (216), मोनाली मल्हारी सुळ (198), अशोक पवळ (132), अनिता दादा अर्जुन (129), भीमा हिरणवळे (214), छाया नवनाथ भिसे (218).
करमणवाडी ः फुलाबाई किसन पुणेकर (552, सरपंच). सदस्य : नितीन पावणे (242), रेखा नितीन पवार (237), ताईबाई प्रकाश मेहेर (200), अमोल सायकर (209), सोनाबाई अंकुश पुणेकर (187), नितीन खराडे (202), रेखा भरत बनसोडे (184). औटेवाडी ः शशीकला महादेव मोरे (बिनविरोध, सरपंच) सदस्य : देविदास आबासाहेब महाडीक, अर्चना यादव कापसे, मनिषा संदीप कापसे, महेंद्र ज्ञानदेव ढमे, लताबाई नवनाथ पवार, सुजाता जनार्दन मुरकुटे (वरील सर्व बिनविरोध) तर उर्वरीत एका जागेसाठी राहुल ढवाण 104 मते मिळवत विजय संपादन केला. (दोन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक)
दुधोडी ः ग्रामपंचायतीमध्ये अर्चना सचिन जांभळे 274. ताजु ः ग्रामपंचायतीमध्ये राजश्री निखिल बनसोडे 274 यांनी विजय मिळवला.
SvgwVdzjNekhsf