पाथर्डी-शेवगावातील पोलिस पाटील पदाचे आरक्षण जाहीर
लवकरच लेखी परिक्षा होवून जागा भरणार । अनेकांची मोर्चेबांधणी सुरु
पाथर्डी । वीरभूमी - 07-Dec, 2023, 06:48 PM
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 196 गावांतील पोलिस पाटील पदभरतीसाठी आरक्षणसोडत जाहीर करण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी पाथर्डी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर, शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे, पोनि. संतोष मुटकुळे, पोनि. दिगांबर भदाने आदीसह अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोडतीनंतर इच्छित आरक्षण निघाल्याने काहींनी समाधान मानले तर काहींची संधी हुकल्याने उपस्थितांच्या चेहर्यावर कही खुशी, कही गम अशी अवस्था पहायला मिळाली. तर इच्छित आरक्षण निघाल्यानंतर अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र या पदांसाठी लवकरच लेखी परीक्षा होणार असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले.
सोडतीमध्ये निघालेले गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे- अनुसुचित जाती - जोगेवाडी, पिरेवाडी, खांडगाव, सांगवी खुर्द, अंबिकानगर, हत्राळ, सोमठाने नलावडे, कोरडगाव, दहिगावशे, ताजनापूर, शिंगोरी, आंतरवाली खु. ने., वरुर बु., आखेगाव डोंगर, घेवरी. अनुसुचित जाती (महिलांसाठी)- आपेगाव, कुरुडगाव, मजलेशहर, थाटे, अंतरवाली खु. शे, सातवड.
अनुसुचित जमाती- आंत्रे, देवळाणे, कौडगाव, ढोरसडे, मलकापूर, विजयपूर, कडगाव, बोंदरवाडी, कामत शिंगवे, रांजणी (ता. शेवगाव), सामनगाव. अनुसुचित जमाती (महिलांसाठी)-घाटशिरस, सोनेसांगवी, हनुमान टाकळी, रांजणी (ता. पाथर्डी), नवीन दहिफळ.
विमुक्त जाती अ- सेवानगर, पत्र्याचा तांडा, घुमटवाडी, शेकटे खुर्द (ता. शेवगाव), दिवटे. विमुक्त जाती अ (महिलांसाठी)- बोरसेवाडी, धामणगाव. भटक्या जमाती ब- मुंगी, मुर्शतपूर, मढी. भटक्या जमाती ब (महिलांसाठी)- मुरमी, रेणुकाईवाडी. भटक्या जमाती क- हाकेवाडी, काळेवाडी, रुपनरवाडी. भटक्या जमाती क (महिलांसाठी)- शहाजापूर, मोहरी. भटक्या जमाती ड- गितेवाडी, डोंगरवाडी, डमाळवाडी. भटक्या जमाती ड (महिलांसाठी)- बडेवाडी.
विशेष मागासवर्ग- कोनोशी, शहापूर, खडके, कळसपिंप्री. विशेष मागासवर्ग (महिलांसाठी)- वाडगाव (ता. शेवगाव).
इतर मागासवर्ग- लोळेगाव, पिंगेवाडी, भाविनिमगाव, औरंगपूर, दुलेचांदगाव, ढोरजळगाव ने, हातगाव, बालमटाकळी, शिंदेवाडी (ता. पाथर्डी), वैजुबाभुळगाव, जाटदेवळे, निंबे, पागोरी पिंपळगाव, खेर्डे, गरडवाडी (ता. शेवगाव), माळेगावने (ता. शेवगाव), आव्हाणे बु., कासारवाडी. इतर मागासवर्ग (महिलांसाठी)- लखमापुरी, मळेगाव (ता. शेवगाव), राघोहिवरे, आखतवाडे, रावतळे, केळवंडी, प्रभुपिंप्री, वाळुंज.
इडब्लूएस (आर्थिक मागासवर्ग)- धारवाडी, माळेगाव (ता. पाथर्डी), खामगाव, खुंटेफळ, खरडगाव, तिसगाव, ढवळेवाडी, जवखेडे दुमाला, निपाणी जळगाव, धायतडकवाडी, वसु (ता. पाथर्डी), बक्तरपूर, सोनोशी, सुळे पिंपळगाव. इडब्लूएस (आर्थिक मागासवर्ग) महिलांसाठी- कोल्हार, डांगेवाडी, आडगाव, केशव शिंगवे, शेकटे बु. (ता. पाथर्डी), माळीबाभुळगाव.
खुला- धनगरवाडी (ता. पाथर्डी), मंगरुळ बु., चिंचपूर पांगुळ, गोळेगाव, पिंपळगव्हाण, शिरापूर, मांडवे, चुंभळी, कर्जत खु. (दहिफळ) (ता. शेवगाव), वाघोली, काळेगाव फकीरा, कोपरे, पालवेवाडी, खानापूर, चितळी, निंबोडी, मुंगुसवाडे, वडगाव, जवखेडे खालसा, आंतरवाली बु., ढाकणवाडी (खरवंडी कासार, ता. पाथर्डी), देवटाकळी, बर्हाणपूर, जोहरवाडी, कोळगाव (ता. शेवगाव), जोहरापूर, मोहोज देवढे, पाडळी, भिलवडे, सांगवी बु. (ता. पाथर्डी), भालगाव, पारेवाडी, ढोरजळगाव शे, तिनखडी, सुकळी, आव्हाणे खुर्द, करडवाडी, भोसे, सोमठाणे, नांदूर निंबादैत्य, नांदूर विहिरे, निवडुंगे, आगसखांड, ढाकणवाडी, दादेगाव, दगडवाडी, शेकटे (ता. पाथर्डी), कोळसांगवी, कारेगाव, कासार पिंपळगाव, कर्हेटाकळी, बोडखे, नागलवाडी, जांभळी, भवरवाडी, घोटण, सैदापूर, जवळवाडी, करोडी, वरुर खुर्द, डमाळवाडी (माणिकदौंडी).
खुला (महिलांसाठी)- जिरेवाडी, भारजवाडी, शोभानगर, देवराई, वाडगव्हाण, अकोला, चिचोंडी, तोंडोळी, लाखेफळ, बेलगाव, चितळवाडी, त्रिभुवनवाडी, चेडेचांदगाव, लांडकवाडी, मोहोज खु., कासाळवाडी, मानेवाडी, मंगरुळ खु., मालेवाडी, भायगाव, चेकेवाडी, हिंगणगाव ने, वरखेड, साकेगाव, सालवडगाव, कांबी.
पोलिस पाटील पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भरतीप्रकियेची प्रतिक्षा लागून राहीली आहे. याबाबत लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार असून पदासाठी आलेल्या अर्जदारांची लेखी परिक्षा होणार असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले.
zpSuqRJNY