विवाहितेचा मृतदेह जळालेल्या तर तरुणाचा मृतदेह फास घेतलेल्या अवस्थेत आढळला । पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
पाथर्डी । प्रतिनिधी- 23-Mar, 2025, 11:02 PM
तिच लग्न झालेले होते. तो अविवाहीत होता. दोघांच्या कुंटुबाचा चांगला घरोबा होता. शेतात कामाला येणार्या महीलेसोबत त्याच सुत जुळलं. मुलाच्या लग्नाच्या गोष्टी घरातली मंडळी करु लागली. अशातच ते दोघेही 13 मार्च रोजी गावातुन पळुन गेले. 22 मार्चला ती अर्धवट जळालेली व मृतदेह कुजलेला. त्याच्या जवळच त्याने तिचे स्कार्प व त्याचा पंचा अशा दोन्हीची गाठ बांधुन झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह लटकलेला. माळेगाव-दुलेचांदगाव येथील दोन प्रेमवीरांची ही करुण कहानी अखेर घुमटवाडीच्या डोंगरभागात संपली.
पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले व अंत्यसंस्कार करण्यात आले. माळेगाव येथील एक विवाहीत महीला दुलेचांदगाव येथील एका अविवाहीत युवकाच्या प्रेमात पडली. युवकाच्या शेतात कायम कामाला येत असल्याने व मयत महीलेच्या कुटुंबाचा व युवकाच्या कुटुंबाचा चांगला घरोबा होता. युवकाची परस्थीती आर्थिक सुबत्ता असलेली होती. आई-वडीलांना एकुलता एक असलेला मुलगा विवाहीत महीलेच्या प्रेमात पडला. या महीलेला तीन वर्षाचा मुलगा आहे.
युवकाच्या विवाह करण्याची कुजबुज महीलेला लागली. तिने युवकाला दुसर्याच्या मोबाईलवरुन सात वेळा फोन केले. व ते दोघे 13 मार्च 2025 रोजी गावातुन पळुन गेले. घरातील मंडळींनी व पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाने फोनमधील सिमकार्ड काढुन ठेवल्याने त्यांचा शोध घेण्यात अडथळे आले. 22 मार्च 2025 रोजी सांयकाळी घुमटवाडीच्या डोंगरात महीलेचा मृतदेह अर्धवट जळालेला व काहीसा कुजलेला आढळला. शेजारीच एका झाडाला त्याचा पंचा व तिचे स्कार्प याला गाठ मारुन युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेची माहीती समजताच पोलिस हेड काँन्सटेबल सुहास गायकवाड, धनराज चाळक, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये घटनास्थळी गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अतिरीक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपअधिक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप आहेर, ठसेतज्ञांचे पथक, फाँरेन्सीक लँबचे पथक असा मोठा फौजफाटा घुमटवाडीच्या डोंगरात रात्रभर तपास करीत होता.
दोघांचे मृतदेह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. शवविच्छेदन करुन दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी दोघांच्या मृत्युची अकस्मात अशी नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
या घटनेतील प्रेमवीर असलेला युवक आई-वडीलांना एकुलता एक होता. त्याला बहीण देखील नाही. आजोबांनी अतिशय लाडात वाढवलेला हा युवक प्रेमाच्या नादात त्यांच्या घराण्याचा वंशाचा दिवाच विझवुन गेला. तर विवाहिता आपल्या चिमुकल्याला अनाथ करून गेली.
अविचाराने केलेली कोणतीही गोष्ट माणसाला किती अडचणीत आणते याचे हे उत्तम उदाहरण आहे. चुक नसलेल्या दोन्ही बाजुंच्या आई-वडीलांना व नातेवाईकांना देखील यामुळे मनस्ताप व दुःख सहन करण्याची वेळ आली आहे.
ccp7jj