नाकाबंदी दरम्यान शेवगाव पोलिसांची दमदार कारवाई
आठ जणांना अटक । दोन गावठी कट्टे, जीवंत काडतूस, दोन स्कार्पिओसह 13 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव । प्रतिनिधी- 03-Apr, 2025, 06:31 PM
पैठण येथून शेवगावच्या दिशेने आलेल्या दोन स्कार्पिओमधील इसमांकडे गावठे कट्टे असल्याच्या गुप्त माहितीववरुन शेवगाव शहरातील क्रांती चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. दरम्यान या तपासणीमध्ये दोन गावठी कट्टे, दोन देशी बनावटीचे मॅक्झीन, आठ जीवंत काडतूस व अकरा मोबाईल असा तब्बल 13 लाख 35 हजार 400 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली असून अटक केलेल्या व्यक्तींचा हेतू काय होता हे तपासात निष्पन्न होईल मात्र पोलिसांच्या दमदार कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवार दि. 3 रोजी पहाटे 3ः30 वाजताचे सुमारास पोनि. समाधान नागरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून दोन स्कार्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव येथे येणार असून सदर इसमांकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत, अशी माहीती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. सुंदरडे, सपोनि. काटे, पोना. आदिनाथ वामन, पोकॉ. शाम गुंजाळ, पोकॉ. राहुल खेडकर, पोकॉ. राहुल आठरे, चा.पो.ना धायतडक, पोहेकॉ. गोरे, सफौ. वाघमारे व होमगार्ड अमोल काळे, शिंदे, रवि बोधले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
नाकाबंदी करीत असताना पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन स्कार्पिओ वाहन (एमएच 16, एबी 5454 व एमएच 17, एझेड 4199) हे पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलिसांनी दोन्ही वाहने अडवली. दोन्ही वाहनांपैकी एमएच 16, एबी 5454 या वाहनांमध्ये एकूण पाच इसम मिळून आले.
वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे ड्रायव्हर सीटच्या बाजुचे सीट समोरील ड्रावरमध्ये एक गावठी कट्टा, दोन मॅक्झीन व 4 जीवंत काडतुस मिळून आले. दुसर्या स्कर्पिओच्या सिट कव्हरमध्ये एक काळ्या रंगाची हॅण्ड बॅग मिळून आली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा, दोन मॅक्झीन व 4 जीवंत काडतुस मिळुन आले.
पोलिसांनी या गावठी कट्ट्याबाबत चौकशी केली असता वाहनातील इसमांना काहीही माहिती सांगता आली नाही. यामुळे त्यांची अंगझडती घेतली असता 11 मोबाईल आढळून आले. पोलिसांनी दोन्ही स्कर्पिओसह 70 हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे, दोन हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे चार मॅक्झीन, 4 हजार 500 रुपये किंमतीचे गावठी कट्टा ठेवण्यासाठीची बॅग, 400 रुपये किंमतीचे आठ जीवंत काडतूस, 52 हजार 500 रुपये किंमतीचे 11 मोबाईल असा तब्बल 13 लाख 35 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमालासह सदर मिळुन आलेल्या अग्णीशत्राबाबत वाहनातील ईसमांना विचारना केली असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच सदर अग्णीशस्त्रा बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्यांचेकडे नसलेबाबत सांगीतले.
त्यामुळे सदर ईसमांचे ताब्यात बेकायदेशिररित्या अग्णीशस्त्र मिळून आल्याने अंकुश महादेव धोत्रे (रा.बोरगाव, ता.जि.अहिल्यानगर), शेख आकिब जलील (रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर, सुलतान अहमद शेख (रा. गोविंदपुरा, अहिल्यानगर), दीपक ज्ञानेश्वर गायकवाड (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर), मुक्तार सय्यद सिकंदर (रा.अहिल्यानगर), पापाभाई शब्बीर बागवान (रा. वेस्टर्न सीटी, श्रीरामपुर), सोहेल जावेद कुरेशी (रा. फातेमा हाऊसींग सोसायटी, श्रीरामपूर), आवेज जुबेर शेख (रा. मिल्लतनगर, वार्ड क्र.1, श्रीरामपुर) या आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोना. आदिनाथ तुकाराम वामन यांचे फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 309/2025, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.
f4fyv9